कावासाकीने लॉन्च केली ‘बीएस६ निंजा ६५०’ स्पोर्ट्स बाईक; जाणून घ्या किंमत

कावासाकीने लॉन्च केली ‘बीएस६ निंजा ६५०’ स्पोर्ट्स बाईक; जाणून घ्या किंमत

कावासाकीने भारतीय बाजारपेठेत ‘बीएस६ कम्प्लेट कावासाकी निंजा ६५०’ ही दुचाकी लॉन्च केली आहे. दिल्ली एक्स शोरूम किंमत ६.२४ लाख रुपये आहे. बीएस६ अपग्रेडेशननंतर जुन्या मॉडेलपेक्षा ३५ हजार रुपये महाग आहे. कंपनीने सोमवारपासूनच बुकिंग सुरू केली आहे.

टॉर्क ६४ एनएम

नवी निंजा ६५० ही ६४९ सीसीचा पॅरेलल ट्वीन इंजिन, तसेच यात फरक एवढाच की, एग्जोस्ट आणि एयर बॉक्सचा अंतर पाहायला मिळेल. पहिल्या मॉडेलसारखी ६८ हॉर्स पावरची ताकद आहे. परंतु टॉर्क ६५.७ एनएम कमी होऊन ६४ एनएम झाला आहे. या बाईकचे वजन १९६ किलो आहे.

ट्वीन एलईडी हेडलाईट्स

२०२० मॉडेलमध्ये रिडिझाइन फ्रंट दिले आहे. निंजा ४००, झेडएक्स-६आर आणि वर्सेस १००० शी मिळता-जुळता आहे. तसेच यामध्ये ट्वीन एलईडी हेडलाईट्स दिली आहे. बाईकच्या साईड फेयरिंगमध्ये थोडासा बदल करून शार्प लुक देण्यात आला आहे. याशिवाय विंडशिल्ड आणि टियर लूकमध्ये बदल केला आहे.

फुल टीएफटी इन्स्ट्रुमेंट कंसोल

२०२० निंजा ६५० मध्ये डनलप स्पोर्ट्मैक्स रोडस्पोर्ट टायर दिले आहेत. याशिवाय ४.३ इंचचा फुल टीएफटी इन्स्ट्रुमेंट कंसोल दिला आहे. जो ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि स्मार्टफोन कनेक्विविटीला सपोर्ट करतो.

First Published on: May 13, 2020 3:09 PM
Exit mobile version