Kedarnath Yatra : सलग सात तास झालेल्या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित

Kedarnath Yatra : सलग सात तास झालेल्या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये चालू असलेल्या केदारनाथ यात्रेवर आता खराब वातावरणाचा परिणाम पहायला मिळत आहे. या परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून केदारनाथमध्ये सात तास सलग झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि पावसामुळे सोनप्रयागमध्ये चालू असलेल्या यात्रा तूर्तास थांबवण्यात आली आहे. फाटा ते गौरीकुंड पर्यंत चालू असलेली हेलीकॉप्टर सेवा सुद्धा थांबवण्यात आली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढला असल्याने प्रशासनाने यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड सरकारने सोमवारी याबाबत घोषणा केली असून हवामानाच्या बदलामुळे या ठिकाणची हेलिकॉप्टर सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. शिवाय केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबवण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्च्या मते, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चालत प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना जागीच थांबवले असून आपापल्या हॉटेलमध्ये परत जाण्यास सांगितले आहे. शिवाय भाविकांना मंदिराकडे मार्गक्रमण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जवळपास पाच हजार लोकांना गुप्तकाशीपासून परत पाठवण्यात आले आहे.

याशिवाय उत्तरकाशीमध्ये देखील पावसाचा जोर वाढल्यामुळे यमुनोत्री यात्रा देखील थांबवण्यात आली आहे. मात्र वातावरण पूर्वरत झाल्यावर यात्रांवरील बंदी हटवण्यात येणार आहे.

 


हेही वाचा :Masjid row : आता कर्नाटकमधील मशिदीत हिंदू मंदिर अवशेष सापडल्याचा दावा; परिसरात कलम 144 लागू

First Published on: May 25, 2022 2:22 PM
Exit mobile version