Kerala floods: अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान!!!

Kerala floods: अफवा पसरवणाऱ्यांनो सावधान!!!

MAHARASHTRA HELPS KERALA FLOODS

केरळमधील पूरग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करा!! असा मेसेज तुम्हाला आला आहे? तर सावधान!! कारण अशा अफवा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्याची दखल थेट आता केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो संसार उद्धवस्त झालेत. त्यामुळे देश-विदेशातून देखील केरळला मदतीचा गहात पुढे केला जात आहे. पण, केरळमध्ये सुरू असलेल्या या मदतीवर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा देखील पसरवल्या जात आहे. त्याची दखल आता केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. केरळमध्ये राज्या-राज्यातून मदत कार्य राबवले आहे. पण याच मदतीवर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. यासंदर्भातील काही धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे पोलीस देखील अशा विघ्नसंतोषी लोकांविरोधात कडक कारवाईच्या तयारीमध्ये आहेत. मुख्यमंत्री कार्यालयामधून त्याबद्दल आदेश देण्यात आल्याने या गोष्टीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.

वाचा – केरळमध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून महाराष्ट्रातील डॉक्टर सज्ज

केरळ आणि अफवांचे लोण!

केरळमधील पूरग्रस्तांना मदत करायची असल्यास त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करा. तर, ओखीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. अशा प्रकारच्या अफवा या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. त्याची गंभीर दखल आता मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. परिणामी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

देश-विदेशातून मदतीचा हात

पुरामुळे उद्धवस्त झालेल्या केरळला सावरण्यासाठी आता देश-विदेशातून मदतीचे हात पुढे आले आहेत. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आता महाराष्ट्रातील १०० हून अधिक डॉक्टरांची टीम केरळच्या त्रिवेंद्रममध्ये दाखल झाली आहे. हे डॉक्टर आज आवश्यक त्या ठिकाणी जाऊन आरोग्यसेवा पुरवणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील डॉ. संतोष गिते यांनी ‘ आपलं महानगर ‘शी बोलताना दिली आहे.

३ ते ४ दिवस पुरेल एवढा औषधांचा, खाद्यपदार्थांचा साठा

केरळमध्ये पडलेल्या पावसाचे पाणी ओसारायला आणखी काही दिवस लागू शकतील. त्यामुळे हे डॉक्टर्स आपल्यासोबतच विमानातून औषधांचा आणि खाद्यपदार्थांचा साठा घेऊन गेले आहेत. त्याचा फायदा या पूरग्रस्तांना होणार आहे. या पूरात २ लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. तर, ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू नये यासाठी महाराष्ट्रातील डॉक्टर्स प्रयत्न करणार आहेत. परिसरात डेंग्यू, मलेरिया किंवा इतर साथीचे आजार पसरु नयेत म्हणून पुढचे ३ ते ४ दिवस पुरेल एवढा औषधांचा साठा या डॉक्टरांच्या टीमकडे आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि उपचारांसाठी खूप मोठा फायदा महाराष्ट्रातील डॉक्टरांचा होणार आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर्स सध्या या टीममध्ये सहभागी आहेत.

First Published on: August 20, 2018 9:29 PM
Exit mobile version