धक्कादायक! नवऱ्याने मित्रांना बोलवून बायकोवर केला बलात्कार

धक्कादायक! नवऱ्याने मित्रांना बोलवून बायकोवर केला बलात्कार

प्रातिनिधिक छायाचित्र

केरळमधून सामूहिक बलात्काराचे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक नवऱ्याने आपल्या मित्रांसमवेत बायकोवर सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादीनामाकुलम जवळ घडली आहे. गुरुवारी रात्री निर्जन ठिकाणी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार,  नवरा आणि त्याच्या मित्रांनी त्या महिलेला जबरदस्तीने दारू पाजली. आणि निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने ही तक्रार करताच पोलिसांनी पीडितेच्या पतीसह पाच जणांना गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, मद्यधूंद अवस्थेतील नवरा आणि त्याचे मित्र यांच्या तावडीतून महिला कशीबशी सुटली आणि मुख्य रस्त्यावर पोहोचली. रस्त्यावर धावत येताच, तीची रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक बसली. पोलिसांनी पतीसह सर्व आरोपींविरोधात कलम ३२३, ३२४, ३५४, ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील बाडमेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेथे एकाच कुटुंबातील दोन मुलींवर शेजारी बलात्कार करत होता. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेजारी असल्याचा फायदा घेत मुलींना फसवून घरात नेत असत. जिथे त्यांचे अश्लील फोटो काढले गेले होते,  त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केला जात होता. पोलिसांनी सांगितले की, या दोघेही सख्या बहिणी होत्या. त्यातील एक १७ आणि दुसरी १५ वर्षांची आहे. आरोपी तनवीर माळी आणि नरेश दिशांतारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शाळेत जात असताना दोन्ही बहिणींना त्रास देत होते. यामुळे दोन्ही मुलींनीही शाळेत जाणे बंद केले.


हे ही वाचा – भूमाफियांनी महिलेला शेतात जिवंत जाळले, घटना कॅमेरात कैद!


 

First Published on: June 5, 2020 8:35 PM
Exit mobile version