Corona : उत्तर कोरियात आढळला पहिला रूग्ण; किम जोंगने केली Emergency लागू

Corona : उत्तर कोरियात आढळला पहिला रूग्ण; किम जोंगने केली Emergency लागू

किम जोंग उन

जगभरात कोरोनाचे हाहाकार माजवला असताना उत्तर कोरियाने मात्र आपल्या देशात एकही कोरोना रूग्ण नसल्याचे म्हटले होते. परंतू आता तब्बल आठ महिन्यानंतर उत्तर कोरियांमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. किम जोंग यांनी सीमेलगतच्या केसोंग भागात लॉकडाउन जाहीर केली. संशयित कोरोनाबाधित रुग्ण हा अवैधपणे सीमा ओलांडून आला असल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती तीन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात गेली होती. त्यानंतर अवैधपणे सीमा ओलांडून पुन्हा एकदा उत्तर कोरियात प्रवेश केला असल्याचे वृत्त उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

या कोरोनाबाधित रूग्णाला अधिकृतपणे बाधित जाहीर करण्यात आले नसल्याचे समजते. या रुग्णाला कोरोनाबाधित असल्याचे जाहीर केल्यास तो उत्तर कोरियातील पहिला रुग्ण ठरणार आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी झाली की नाही याबाबतची माहिती स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिली नाही. मात्र, त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने एकही कोरोनाबाधित नसल्याचा सातत्याने दावा केला होता. मात्र, करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई केली असून मास्क घालणे आणि सीमा भागात काम करत असलेल्यांचे विलगीकरण करण्याचे आदेश किम जोंग सरकारने दिले आहेत.

हेही वाचा –

मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले, लोकल सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार पण…

First Published on: July 26, 2020 12:56 PM
Exit mobile version