Corona Vaccine: ‘या’ लोकांनी लस घेताना एकदा नक्की विचार करा

Corona Vaccine: ‘या’ लोकांनी लस घेताना एकदा नक्की विचार करा

प्रातिनिधीक फोटो

संपूर्ण जगात कोरोनाबाधितांच्या आकडेवारी घट झाल्याचे दिसत आहे. तर आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे काही देशात कोरोना लसीकरम मोहीम सुरू देखील करण्यात आली आहे. फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका यासारख्या लसी त्याच्या लसीकरण चाचणीत यशस्वी झाले असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम देखील झाल्याचे दिसले नाही. यासह भारतातही कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींची चाचणी झाल्यानंतर त्याचा चांगला परिणाम समोर आल्यानंतर त्याच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली.

दरम्यान, कोरानाची लस मोठ्या लोकसंख्येसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु नंतर काही लोकांना अत्यंत विचारपूर्वक लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना लस घेण्यापूर्वी कोणत्या लोकांना डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. खालील काही लोकांनी कोरोनाची लस घेताना एकदा विचार करणं किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

1.त्वचेच्या अॅलर्जीची समस्या असणारे लोक

अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention नुसार, फायझर आणि मॉडर्नाची लस काही जणांना दिल्यानंतर त्यांना अलर्जी झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर किरकोळ समस्या निर्माण होणं सामान्य आहेत, परंतु अ‍ॅनाफिलेक्सिस सारख्या अॅलर्जी प्राणघातक असू शकते. सीडीसीने अशी शिफारस केली आहे की, जर एखाद्याला लसीमध्ये वापरलेल्या कोणत्याही पदार्थांपासून अॅलर्जी असेल तर त्यांनी ही लस घेऊ नये. इंजेक्शन घेतल्यानंतर कोणालाही अॅलर्जीची समस्या असल्यास, कोरोना लस घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घ्यावा.

2. गरोदर आणि स्तनदा माता, महिला

कोरोना लस घेण्यापूर्वी गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती महिलांमध्ये कोविड 19 लसच्या सुरक्षिततेविषयी कोणताही डेटा नाही कारण त्यांना क्लिनिकल चाचण्यांमधून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, या लोकांसाठी ही लस अधिक चिंताजनक असू शकते.

3. कोरोनाबाधित असणारे लोकं

कोरोना संक्रमित झालेल्यांसाठी क्लिनिकल ट्रायल्समध्ये ही लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे. सीडीसीच्या मते, कोरोनाने संक्रमित झालेल्या व्यक्तीस लस दिली जाऊ नये जोपर्यंत ती पूर्णपणे या माहामारीपासून पूर्णपणे बाहेर पडत नाही. तर जे अँटीबॉडी थेरपी घेतात त्यांनी ही लस 3 महिन्यांनंतर घेतली पाहिजे.

4. ज्यांना आधीपासून एखाद्या आजार असेल

क्लिनिकल चाचणीनुसार, निरोगी लोकांवर लसीचा जितका प्रभाव पडतो तितकाच एखाद्या आजाराने पिडीत असलेल्या लोकांवर देखील तितकाच प्रभाव पडतो. त्यामुळे कोणत्याही आजाराची वैद्यकीय ट्रिटमेंट सुरू असल्यास त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

5. लहान मुलांना अद्याप लस नाही

मॉडर्ना लस 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. तर फायझर लस 16 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी अधिकृत केली गेली आहे. तसेच भारत बायोटेकची लस 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांना दिले जाऊ शकते. कोविशील्ड 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी, कोविड -19 लसचा अभ्यास मुलांमध्ये झालेला नाही, म्हणून त्यांना ही लस देण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.

 

First Published on: January 13, 2021 11:12 AM
Exit mobile version