कोलकातामध्ये स्फोट, १ ठार

कोलकातामध्ये स्फोट, १ ठार

कोलकात्यातील डम-डम परीसरात स्फोट (सौजन्य- द स्टेटसमन)

कोलकात्यातील डम- डम परीरातील नागेर बाजारात आज स्फोट झाला. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर आहे. तर या स्फोटात ८ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागेर बाजार हा गजबजलेला असतो. सकाळी ९ वाजता एका दुकानाबाहेर हा स्फोट झाला. स्फोटावेळी या परीसरात मोठा आवाज झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपास सुरु

डम डम मधील काजीपारा परीसरातील, ९ जेसूर रोडवर हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय अधिक तपासासाठी सीआयडी देखील घटनास्थळी दाखल झाली. यावेळी तपासात त्यांना अनेक ठिकाणी खिळे सापडले. पण स्फोट नेमका कसा करण्यात आला ते अद्याप कळलेले नाही. घटनेच्या ठिकाणी कोठेही गनपावडर देखील आढळली नाही. तर एक ज्यूट बॅग सापडली आहे. सीआयडीकडून आता याचा अधिक तपास सुरु आहे.

मिठाई आणायला गेला आणि…

बाजारात झालेल्या स्फोटामध्ये एका ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचे नाव बिस्वास घोष आहे. सकाळी तो बाजारात मिठाई आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी हा स्फोट झाला. त्याला तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण दोन रुग्णालयांनी त्याला उपचारासाठी योग्य उपचार पद्धती नसल्याचे सांगत दाखल करुन घेणे टाळले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. बिस्वासची आई घरकाम करते. ती काम करते ते कुटुंब बाहेर गेल्यामुळे ती मुलाला घेऊन बाजारात गेली. त्यावेळी हा स्फोट झाला. यात तिची आई देखील जखमी झाली आहे.

हे आरएसएसचे षडयंत्र ?

स्फोटाचा तपास सुरु असताना आता कोलकातामध्ये राजकीय वातावरण तपासाला सुरुवात झाली आहे. त्रिनमुल काँग्रेसचे नेते आणि डमडम महानगर पालिकेचे अध्यक्ष पंचू गोपाल रॉय यांनी हा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. आज गांधी जयंती असून गांधींना मारणाऱ्या गटाचे हे काम असल्याचे ते म्हणाले. शिवाय या आधी हिंदू संघटनांनी केलेला स्फोटही अशाच प्रकारचा होता, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेता त्यांनी सांगितले.

First Published on: October 2, 2018 5:48 PM
Exit mobile version