ज्येष्ठ रंगकर्मी उषा गांगुली यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी उषा गांगुली यांचे निधन

उषा गांगुली

कोलकातामधील ज्येष्ठ रंगकर्मी उषा गांगुली यांचे ७५ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घरातील एका व्यक्तीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. त्यानंतर डॉक्टरांना घरी बोलावण्यात आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. उषा गांगुली त्यांचा एक मुलगा असून त्या मात्र घरामध्ये एकट्या राहत होत्या. त्याचे पती कमलेंद्र यांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर तीन दिवसांपूर्वी उषा गांगुली यांच्या भावाचे निधन झाले.

हेही वाचा – दिलासादायक: पुण्यातील ९२ वर्षीय आजीने कोरोनाला हरवलं

१९७६ साली रंगकर्मी समुहाची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था महाभोज, रुदाली, कोर्ट मार्शल आणि अंतयात्रा सारख्या नाटकांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जाते. उषा गांगुली यांना बंगालमध्ये हिंदी रंगभूमीला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी ओळखले जाते. रंगभूमी हेच माझे जीवन आहे आणि रंगकर्मी हे माझं कुटुंब, असे त्यांचे मत होते.

First Published on: April 23, 2020 6:30 PM
Exit mobile version