फेसबुक पोस्टवरून मुलीला मिळाली बलात्काराची धमकी

फेसबुक पोस्टवरून मुलीला मिळाली बलात्काराची धमकी

प्रातिनिधिक फोटो

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्लयानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पाकिस्तानला अपशब्द वापरले. लोकांचा रोश शिगेला जाऊन लोकांनी रस्त्यावरही पाकिस्तानचे झेंडे जाळले. काश्मीरी नागरिकांच्या मदतीने हा हल्ला झाल्याचे उघडकीस आल्यापासून लोकांना रोष काश्मीरी नागरिकांवर असल्याच्या पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आल्या होत्या. भारतात राहत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अशाच पोस्ट शेअर करणाऱ्या कोलकाता येथील मुलीला फेसबुकवरून बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी मिळाली आहे. पिडीत मुलगी १२ वीत शिकत असून तिने १५ तारखेला या संबधात फेसबुक पोस्ट शेअर केली होती.

पाकिस्तानात जाण्याचा सल्ला 

या मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोस्ट शेअर केल्यानंतर काही लोकांनी तिला देश सोडून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. फेसबुकवरील फोटोच्या सहाय्याने काही लोक तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे या मुलीने सांगितले आहे. “मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मी तत्काळ फेसबुक पोस्ट डिलिट केली. मात्र तो पर्यंत ही पोस्ट अनेकांपर्यंत पोहचली. आता हे तरुण माझा पत्ता शोधत आहे. मी मागील दोन दिवसांपासून शाळेतही गेली नाही. मी माझे फेसबुक अकाऊंट डिलिट करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे पीडित मुलीने सांगितले आहे. या मुलीने पोलिसांकडे याची तक्रारही नोंदवली आहे. कोलकाताचे सायबर पोलिसांनी या संबधीत तक्रार नोदंवून घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.

First Published on: February 21, 2019 8:40 AM
Exit mobile version