कुलगाममध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाममध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाममध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा शनिवारी रात्री चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. झीनत उल इस्लाम आणि शाकील अहमद दार अशी त्या दहशतवाद्यांची नावे असून ते दोघेही हिजबुल मुजाहिद्दिनशी संबंधित अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जवानांना कुलगाम जिल्ह्यातील काटापोरा आणि यारीपोरा या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अशी झाली चकमक

कुलगाम जिल्ह्यातील काटापोरा आणि यारीपोरा या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर केंद्रीय राखील पोलीस दल, राज्य पोलीस आणि लष्कराने एकत्रिपणे या भागात शोधमोहिम सुरु केली. या दरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत मारला गेलेला झीनत उल इस्लाम हा शोपियन जिल्ह्यातील रहिवासी असून तो २०१५ मध्ये हिजबुलमध्ये सामील झाला होता. तर शाकील अहमद दार हा आयईडी बॉम्ब बनविण्यात मास्टर असल्याचे समोर आले आहे.

पुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली होती. पुलवामा जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या लष्कराच्या जवानांवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून या दहशतवाद्याकडून अत्याधुनिक शस्त्र जप्त करण्यात आले होते. गस्तीवरचे जवान सावध होत त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार सुरु केला आहे. यावेळत चकमक सुरु असलेल्या संपूर्ण भागाला लष्कराने घेरले होते.


वाचा – पुलवामामध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा


 

First Published on: January 13, 2019 11:00 AM
Exit mobile version