दक्षिण आफ्रिकेतून मोदींनी आणलेल्या चित्त्यांनी केली पहिली शिकार

दक्षिण आफ्रिकेतून मोदींनी आणलेल्या चित्त्यांनी केली पहिली शिकार

भोपाळ – कुनो नॅशनल पार्कच्या (Kuno National Park) मोठ्या आवारात सोडलेल्या चित्त्यांनी (Cheetah) २४ तासांच्या आत शिकार केली आहे. चित्त्यांनी सोमवारी पहाटे एका हरणाची शिकार केली. १७ सप्टेंबर रोजी नामीबियामधून आणलेल्या चित्त्यांची ही पहिली शिकार आहे. तसंच, चित्ता आता शिकार करून स्वतःच्या भोजनाची व्यवस्था करू शकतात, पण त्यांना गरज पडल्यास भोजन पुरवलं जाईल अशी माहिती पीसीसीओफ जसवीर सिंह चौहान यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशमधील कुनो या नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते आणले होते. या चित्त्यांना एका छोट्या आवारात ठेवण्यात आलं आहे. आठपैकी दोन चित्त्यांना रविवारी मोठ्या आवारात सोडण्यात आलं. पहिल्याच दिवशी त्यांनी खुल्या जंगलात तुफान मस्ती केली. तसंच, हरिण आणि सांभर यांच्या मागे दौड लावली. यावेळी हरणाची शिकार करण्यास चित्त्यांना यश आलं.

हेही वाचा 70 वर्षांनंतर भारतीय भूमीवर आलेले चित्ते मोदींनी सोडले मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये

आठपैकी दोन चित्त्यांनाच खुल्या जंगल्यात सोडण्यात आलं. या दोन चित्त्यांचं निरिक्षण करण्यात आलं. मोठ्या सीसीटीव्ही कॅमेरासह ड्रोन कॅमेरातून या चित्त्यांचं मॉनिटरिंग करण्यात आलं. मोकळ्या आवारात फिरायला मिळाल्याने हे दोन्ही आनंदित असल्याचं दिसलं.

उर्वरित सहा चित्ते अजूनही लहान आवारात क्वारंटाइन करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच चित्त्यांना एकत्र ठेवता येणार नाही. आधी ज्यांना सोडलं आहे ते व्यवस्थित बाहेर राहतात की नाही यावर निरिक्षण केलं जाईल. बाहेर या चित्त्यांचा व्यवहार चांगला राहिल्यास इतर चित्त्यांनाही टप्प्याटप्प्याने बाहेर सोडण्यात येणार आहे.

दक्षिण अफ्रिकेतून आणलेल्या या आठ चित्त्यांना नावे देण्यात येणार आहेत. यासाठी देशभर स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यामध्ये ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. तसंच, चीता प्रोजेक्टसाठीही स्पर्धा भरवण्यता आली आहे. या ऑनलाईन स्पर्धेत १८ हजारांहून अधिकांनी सहभाग घेतला आहे. ऑनलाईन पद्धतीने सुचवण्यात आलेल्या नावापैकीच नावे चित्त्यांना आणि चित्ते प्रकल्पाला देण्यात येणार आहे.

First Published on: November 7, 2022 5:18 PM
Exit mobile version