बँक खात्याचे KYC झाले नाही मग घाबरू नका; १ जानेवारीपासून नवा नियम लागू

बँक खात्याचे KYC झाले नाही मग घाबरू नका; १ जानेवारीपासून नवा नियम लागू

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि अन्य आर्थिक संस्थानांना नियमाप्रमाणे केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे.खातेधारकांना RBI ने दिलासा दिला आहे. बँक खाते आणि इतर आर्थिक सेवा १ जानेवारी २०२२ नंतर गोठवले जाणार होते.मात्र RBI ने या केवायसी अपडेटची करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.गुरुवारी बँकांमध्ये केवायसी अपडेटचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवला आहे. केंद्रीय बँकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला आहे.ग्राहकांना या केवायसी अपडेटसाठी बँकेत कागदपत्र घेउन जाण्याची गरज नाही.ग्राहकांना केवायसी अपडेट करायचा असेल तर, त्यासाठी लागणारे डॉक्यूमेंट ई-मेल किंवा पोस्टाने पाठवू शकता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि विविध राज्यांत या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि वित्तीय संस्थांना ग्राहकांविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.मात्र बँक खातेधारकांनी केवायसी अपडेट केले नाहीतर, भविष्यात खात्यात केल्या जाणाऱ्या व्यवहारांबाबत प्रतिबंध लावला जाऊ शकते.केवायसी हे बँक ग्राहकांची ओळख पटवण्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेत अकाउंट उघडण्यासाठी केवायसीची आवश्यकता आहे.

‘ही’ कामे ३१ डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ; नाहीतर भरावा लागेल दंड


हे ही वाचा – नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका करणार – अ‍ॅड. संग्राम देसाई


 

First Published on: December 30, 2021 6:57 PM
Exit mobile version