…आणि सुषमा स्वराज यांच्या आठवणीने भावुक झाले आडवाणी

…आणि सुषमा स्वराज यांच्या आठवणीने भावुक झाले आडवाणी

माजी गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणी

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेत्या आणि माजी गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणी यांनी आज माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयींनंतर लाल कृष्ण आडवाणी सुषमा स्वराज यांचे गुरु होते. एक युवा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा सुषमा स्वराज यांचा प्रवास जवळून पाहणारे लाल कृष्ण आडवाणी स्वराज यांना श्रद्धांजली देताना भावूक झाले. सुषमा स्वराज यांच्या मुलीस भेटतांना त्यांचा कंठ दाटून आला आणि अश्रूंद्वारे त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. यावेळी लाल कृष्ण आडवाणी यांची मुलगी प्रतिभा देखील उपस्थित होत्या.

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे काल निधन झाले. त्या ६७ वर्षाच्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सांभाळले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी तब्बेतीच्या कारणावरून सुषमा स्वराज यांनी माघार घेतली होती.

स्वराज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या एकमेव महिला सदस्य होत्या . विशेष म्हणजे इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री होणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. २००९ आणि २०१४ साली त्या विदिशा लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या.

First Published on: August 7, 2019 1:46 PM
Exit mobile version