लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवणार

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवणार

आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4.30च्या दरम्यान त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. लालू प्रसाद यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. पाटण्यातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणले जाणार आहे, अशी माहिती दिली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जनतेकडून प्रार्थना केली जात आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले आहेत. याबाबत तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटणा येथील पारस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कृपया त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करु नका. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना खूप त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो, असे लोकांना आवाहन केले आहे.

शिर्डीवरुन पडल्यामुळे जखमी –

चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसद यादव सध्या जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत. लालू प्रसाद यादव काही दिवसांपूर्वी शिर्डीवरुन पडल्यामुळे जखमी झाले होते. बिहारची राजधानी पाटणा येथील राबडी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लालूंच्या खांद्यावर आणि कमरेलाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.

First Published on: July 6, 2022 11:13 AM
Exit mobile version