लॉकडाऊन १० आठवडे ठेवा, नाहीतर भारतात परिस्थिती गंभार होईल; तज्ज्ञांचा इशारा

लॉकडाऊन १० आठवडे ठेवा, नाहीतर भारतात परिस्थिती गंभार होईल; तज्ज्ञांचा इशारा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने दोन टप्प्यात ४० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. ३ मेला लॉकडाऊन संपणार आहे आणि नागरिक लॉकडाऊन संपवण्याची वाट पाहत आहेत. परंतु जगातील आघाडीचं वैद्यकीय लँसेंट जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी लॉकडाउन हटवण्याची घाई भारताने करू नये, असा सल्ला दिला आहे. लॉकडाऊन एकूण १० आठवडे केलं पाहिजे, असं सुचवलं आहे.

भारतात सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे जो ३ मे रोजी संपेल. ३ मेपासून लॉकडाऊन संपेल, अशी लोकांना आशा आहे. तथापि, एका वृत्त संस्थेशी बोलताना रिचर्ड हॉर्टन यांनी सुचवलं की, लॉकडाऊन हटवण्याची घाई भारताने करू नये आणि कमीतकमी १० आठवड्यांसाठी लॉकडाऊन असावा यावर भारताने विचार करावा.


हेही वाचा – आता कुत्रे शोधणार कोरोनाचा रुग्ण; ब्रिटन देत आहे प्रशिक्षण


रिचर्ड हॉर्टन म्हणाले की ही महामारी कोणत्याही देशात कायमस्वरूपी नाही. ही महामारी स्वतःच संपेल. आपल्या देशात विषाणू नियंत्रित करण्यासाठी योग्य दिशेने कार्य केलं जात आहे. पुढे म्हणाले की, जर भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला तर आपणास दिसून येईल की ही महामारी १० आठवड्यांत नक्कीच संपुष्टात येईल. विषाणू थांबला, तर गोष्टी पुन्हा सामान्य होऊ शकतात.

भारतातील लॉकडाऊन संपण्यावरुन प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “अर्तव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तुम्हाला उद्योग-धंदे सुरु करावे लागतील पण त्यासाठी घाई करू नका. जर आपण घाईघाईने लॉकडाऊन उचललं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

,

First Published on: April 22, 2020 11:38 PM
Exit mobile version