कायदा मंत्रालयाने बदलले नियम; आता कोरोनाबाधित करू शकणार पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान!

कायदा मंत्रालयाने बदलले नियम; आता कोरोनाबाधित करू शकणार पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान!

प्रातिनिधीक फोटो

बिहारमधील कोविड -१९ संक्रमित मतदारांना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट या पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कोविड -१९ संक्रमित अर्थात कोरोनाग्रस्त लोकांना पोस्टल बॅलेट पद्धतीचा वापर करून मतदान करता यावे, यासाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या विधान विभागाने निवडणुकीच्या नियमात बदल केले आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

८० वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांगांना परवानगी

कोरोनाने बाधित मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता याव्या, यासाठी पोस्टल बॅलेटचा वापर करण्याची मुभा देण्यासाठी निवडणूक आयोगाने मंत्रालयाशी संवाद साधला होता. यावेळी अधिकारी म्हणाले, ‘हा निर्णय अगदी सुरक्षित असल्याने मतदानाचा नियम बदलण्याचे आम्ही मान्य केले आहे. अलीकडेच आम्ही ८० वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांग लोकांना पोस्टल बॅलेट वापरण्याची परवानगी दिली. त्याच यादीमध्ये आम्ही कोविड -१९ संक्रमित किंवा कोरोनाचे लक्षण असणाऱ्यांना समाविष्ट केले आहे.’

कोरोनादरम्यान निवडणुका घेणारं बिहार पहिले राज्य

आतापर्यंत दिव्यांग व ८० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना स्थानिक रिटर्निंग अधिकाऱ्यांकडून पोस्टल बॅलेटची सुविधा मिळण्यासाठी फॉर्म १२ डी भरावा लागत होता. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विधानसभा निवडणुका घेणारं बिहार हे पहिले राज्य असणार आहे. निवडणूक आयोगाने हा नियम रद्द करण्यासाठी सरकारशी संपर्क साधला होता. कारण ही महामारी वर्षाच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

विधान विभाग निवडणूक आयोगासाठी नोडल संस्था आहे. कायदामंत्र्यांनी केलेल्या दुरुस्ती मंजूर झाल्यानंतर निवडणूक नियमात सुधारणा केली जाते. दरम्यान, बिहारमध्ये साधारण ७.२० कोटी मतदार असून २४३ सदस्यांची विधानसभेचा कार्यकाळ यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. २९ नोव्हेंबरपूर्वी नवीन विधानसभा स्थापन होणार आहे.


सरकारचा निर्णय! यंदा भारतातून ‘हज’साठी भाविकांना जाता येणार नाही

First Published on: June 23, 2020 5:57 PM
Exit mobile version