Video: खळबळजनक! चेन्नईत विमानात सापडला बिबट्या!

Video: खळबळजनक! चेन्नईत विमानात सापडला बिबट्या!

विमानात सापडलं बिबट्याचा बछडा

वन्यजीव किंवा त्यांचे अवयव यांची आजही मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचं अनेक घटनांवरून दिसून आलं आहे. आजपर्यंत रस्त्याने, जलमार्गाने अशा प्रकारची तस्करी होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आता चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नई विमानतळावर चक्क विमानाच एक बिबट्याचं पिल्लू सापडल्यामुळे विमानतळावर खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे हे बिबट्याचं पिल्लू एका प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडल्यामुळे यामध्ये तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ज्या प्रवाशाकडे हे पिल्लू आढळलं, त्याला चौकशीसाठी तमिळनाडूच्या वनविभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

कसा सापडला बिबट्या?

हे बिबट्याचं पिल्लू विमानात कसं आलं, याची चौकशी करत असताना एअर इंटेलिजन्स युनिटच्या (एआययू) अधिकाऱ्यांना काही गोष्टी समजल्या. हे बिबट्याचं पिल्लू अवघ्या १ महिन्याचं आहे. एका प्रवाशाच्या सामानामध्ये काहीतरी आक्षेपार्ह आढळल्यामुळे विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी लागलीच सामानाची तपासणी केली. त्यामध्ये हे पिल्लू असल्याचं दिसून आलं. या छोट्या बिबट्याला अरिंगर अण्णा झूलॉजिकल पार्कमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, ज्या प्रवाशाच्या सामानामध्ये हे पिल्लू सापडलं, त्याची ओळख अद्याप समोर आली नसून, तो बिबट्याची तस्करी करण्यासाठीच हे पिल्लू सामानात लपवून नेत असावा, असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

First Published on: February 2, 2019 4:34 PM
Exit mobile version