समलैंगिक पत्नी करत होती पुरुषांचा द्वेष; कटरने केले नवऱ्याचे तुकडे

समलैंगिक पत्नी करत होती पुरुषांचा द्वेष; कटरने केले नवऱ्याचे तुकडे

समलैंगिक पत्नीने स्वत: च्या नवऱ्याचा खून करत नवऱ्याचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात घडली. बालविवाहानंतर ७ वर्षांनी जेव्हा नवरा समलिंगी पत्नीला तिच्या सासरच्या घरी येण्यासाठी दबाव आणू लागला. त्यानंतर पत्नीने आपल्या बहिणींसोबत एकत्र येऊन कट रचला. नवऱ्याला घरी बोलावून त्याला नशेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर विद्युत कटरने त्याचे तुकडे करत पीशवीत बांधून गटारात फेकून दिले.

समलैंगिक पत्नीला पुरुषांचा द्वेष होता, या कारणामुळे तिने नवऱ्याचा खून केला. बऱ्याच काळापासून सीमाचे अनेक मुलींशी समलिंगी संबंध होते. बालपणात झालेल्या लग्नानंतर जेव्हा पती चरणसिंगने तिला सासरी आणण्याचा आग्रह धरला तेव्हा सीमाला राग आला. त्यांनी चरणसिंगला जोधपुर येथे भाड्याने घेतलेल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याला बेशुद्ध केलं. त्याच्या पत्नीने बाथरुमध्ये त्याला नेलं आणि तिथे त्याचे विद्युत कटरने तुकडे केले.

जोधपूर आयुक्तालयाचे डीसीपी धर्मेंद्रसिंह यादव यांनी सांगितलं की, सीमा, तिच्या बहिणी सीमा, प्रियांका, बबिता आणि या बहिणींचा मित्र भियारम जो या घटनेत त्यांचा साथीदार होता, या सर्वांना अटक केली आहे. चरणसिंग यांच्या मृतदेहाचे काही भाग सापडले नाहीत, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी इलेक्ट्रिक कटरही ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करत पोलीस कोठडी मागितली जाईल, असं डीसीपी धर्मेंद्रसिंह यादव यांनी सांगितलं.


हेही वाचा – अजित पवारांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढेच पार्थचे महत्त्व – सामना


 

First Published on: August 14, 2020 12:02 PM
Exit mobile version