देशमुख पॉवरफुल ! मी नावं घेणार नाही, मला अन् माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, सचिन वाझेचा गौप्यस्फोट

देशमुख पॉवरफुल ! मी नावं घेणार नाही, मला अन् माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, सचिन वाझेचा गौप्यस्फोट

निलंबित एपीआय सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करतानाच मानसिक छळ झाल्याचाही दावा केला आहे. तसेच मला तसेच परमबीर सिंह यांना खोट्या खंडणीच्या प्रकरणात अडकवल्याचा दावाही केला आहे. देशमुख हे पॉवरफुल व्यक्ती आहेत. त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातूनही माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सचिन वाझेने केला आहे. एकुणच आरोग्याच्या सुविधा पुरवतानाही मला टाळाटाळ केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर एक अर्ज करून ही माहिती दिली आहे. पण आयोगाने वाझेचा अर्ज फेटाळल्याची माहिती आहे.

मी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर देशमुख यांच्या माणसांकडून दबाव टाकण्यात आला. देशमुख हे अतिशय पॉवरफुल व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आल्यापासून मला गरजेच्या बेसिक मेडिकल गोष्टी पुरवल्या नाहीत. मला गोरेगावच्या केसमध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप सचिन वाझेने केला आहे.

माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझं अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मला बेसिक मेडिकल ट्रीटमेंट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, असाही आरोप वाझेने चांदीवाल आयोगासमोर केला.

याआधी मंगळवारी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाकडे एटीएसच्या अहवालाची मागणी केली. एटीएसच्या अहवालात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच एटीएसने अॅंटेलिया स्फोटके प्रकरणात मनसुख हिरेन प्रकरणातील ८०० पानी अहवाल चांदीवाल आयोगासमोर सादर केला आहे.


 

First Published on: February 9, 2022 3:48 PM
Exit mobile version