Live Update: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना दिली मान्यता

Live Update: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना दिली मान्यता
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषीविधेयकांना मान्यता दिली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून बिहार दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे.
नुकतेच व्हीआरएस घेणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाटण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांनी जेडीयूतमध्ये प्रवेश केला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत १६९ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २२ हजार ६२९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २४१ पोलिसांचा मृत्यू झाला असून ३ हजार १९० पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १९ हजार १९८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती उमा भारती यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेच्या सामनाच्या वृत्तपत्रासाठी संजय राऊतांना माझी मुलाखत घ्यायची होती. मी काही अटी घालून दिल्या होत्या. त्याप्रमाणेच चर्चा करण्यासाठी या भेटी आयोजन केले होते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे.
सांगलीतील कारागृहातील २ कोरोनाबाधित कैद्यांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाली असल्यामुळे या २ कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कोरोनावर मात केल्यानंतर २८ दिवस उलटल्यानंतर प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत असल्याच्या कारणामुळे राहुल कुल यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा दान केले.
कोरोना संकट काळात कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध वाढवण्यास कारणीभूत ठरले असून ते आणखीनच जवळ आले आहेत, असे पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ८८ हजार ६०० नवे रुग्ण आढळले असून १ हजार १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख ९२ हजार ५३३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शनिवारी तब्बल २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसेंदिवस बऱ्या होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता यामुळे कोरोनाची भिती कमी होण्यास मदत होणार आहे. शनिवारपर्यंत राज्यात १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ७६.९४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे राज्यात शनिवारी दिवसभरात २० हजार ४१९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ इतकी झाली आहे. सविस्तर वाचा 
First Published on: September 27, 2020 6:34 PM
Exit mobile version