Live Update: फुटबॉल विश्वातील ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

Live Update: फुटबॉल विश्वातील ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ३२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३२ हजार ३९५ वर पोहचली आहे. तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५०४ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २१ हजार ८४१ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३५४ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ९८ हजार १२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हिमाचल प्रदेशचे मंत्री रामलाल मार्कंडा यांनी त्यांची कोरोना चाचाणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.


रोनाल्डो हा एक फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याचे करोडो चाहतेही आहेत. त्यामुळे रोनाल्डोला कोरोना झाल्याची बातमी जेव्हा आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता रोनाल्डो पुन्हा मैदानात कधी दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


राज्यात ८५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,४३,८३७ झाली आहे. राज्यात २,०५,४१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ७०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


भाजपाचे नेते आणि आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. सोमवारपासून सतत धमकीचे फोन येत असल्याने वांद्रे पोलिसांत त्यांनी तक्रार दिली होती. दरम्यान याप्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. (सविस्तर वाचा)


विरारमध्ये कोरोनाचे १० बळी

वसई विरार महापालिका हद्दीत गेल्या दोन दिवसात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी गेला दोन दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एकट्या विरार शहरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात वसईतील ३, नालासोपारातील ४ आणि विरारमधील १ जण आहे. मंगळवारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची विक्रमी नोंद झाली. कोरोनामुळे दिवसभरात १५ जण मृत्युमुखी पडले. त्यातील १० एकट्या विरारमधील आहेत. वसईत ४ आणि नालासोपारात १ जण दगावला. महापालिका हद्दीतील मृतांची संख्या ५१० वर गेली आहे.


गेल्या २४ तासात महाराष्ट्र पोलीस दलात ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या पोलीस दलात २ हजारांहून अधिकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत २६२ जणांचे प्राण कोरोनामुळे गेले आहे.


काल (दि. १२ ऑक्टोबर) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांचा उपचाराकरिता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली मुंबईतल्या आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे. आज वर्षा बंगल्यावर आमदरांची बैठक होणार होती. परंतु परब आणि काही मदारांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी या आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, त्यांचे कार्य पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.


सोमवारच्या आकडेवारीनुसार ६३ दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. सोमवारी देशात कोरोनाच्या ५३,०८२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. १० ऑगस्टनंतर देशात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या इतकी खाली आली आहे. १० ऑगस्टला देशात कोरोनाचे ५१,२९६ रुग्ण सापडले होते. यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला होता.


देशात काल दिवसभरात १० लाख ७३ हजार २४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे १२ ऑक्टोबरपर्यंत एकूण ८ कोटी ८९ लाख ४५ हजार १०७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ८० लाख पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १० लाख ८५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ८५ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


सोमवारी दिवसभरात राज्यात ७,०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे. राज्यात २,१२,४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात १६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

First Published on: October 13, 2020 11:59 PM
Exit mobile version