Live Update: केंद्राकडून हाफकिनला लस प्रकल्प उभारण्यासाठी ६५ कोटी रुपये देणार

Live Update: केंद्राकडून हाफकिनला लस प्रकल्प उभारण्यासाठी ६५ कोटी रुपये देणार

Live update Mumbai Maharashtra

हाफकिनमध्ये लस प्रकल्प उभारण्यासाठी ६५ कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येणार
उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होणार – मुख्यमंत्री
तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी – उद्धव ठाकरे
नाशिक, विरार सारख्या दूर्घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री
कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कामगार दिनाच्या शुभेच्छा
येत्या काही मिनिटांताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह येणार आहे.
गोव्यात गेल्या २४ तासांत ३ हजार २४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ९४५वर पोहोचली आहे. आतापर्यंत ६६ हजार ९३९ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १ हजार १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता जनतेला संबोधणार आहेत. कोरोना, लॉकडाऊनबाबत जनतेशी संवाद साधणार आहेत.
गेल्या २४ तासांत ६ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ७ हजार १९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७ हजार ७८७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७ हजार ३८८ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाख २३ हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शिक्षण संघटनेची सुट्टीची मागणी अखेर मान्य केली आहे. १४ जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १ मे ते १३ जूनपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन यांचे निधन. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे ते अँकर होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका. दिल्लीच्या रुग्णालयात ते कोरोनावर उपचार घेत होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण आणि लॉकडाऊनवर बोलण्याची शक्यता.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोना परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केला जाणार आहे.
देशात गेल्या २४ तासात ३ लाख ८६ हजार ४५२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार ४९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३१ लाख ७० हजार २२८ अँक्टिव रुग्ण आहेत.
केंद्रिय मंत्रीमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी हे भारतातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेणार आहेत.
कानपूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरताना स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाली आहेत.
महाराष्ट्राला आणखी ४०० टन मेडिकल ऑक्सिजन आणि ३० हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया,लींडे,एअर लिक्विड,टायो निप्पॉन,डे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आणि अनेक छोट्या उत्पादकांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे. सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू,केरळ आणि पुद्दचेरी विधानसभा निवडणूकांचे निकाल २ मे रोजी घोषित होणार आहेत. मात्र त्याआधी एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यानुसार दोन राज्यात भाजप,बंगालमध्ये ममता बनर्जी यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
First Published on: April 30, 2021 10:32 PM
Exit mobile version