फुकट पेट्रोलसाठी संपूर्ण गाव धावले

फुकट पेट्रोलसाठी संपूर्ण गाव धावले

पेट्रोलच्या टँकरचा अपघात

पेट्रोल – डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे जनता खूप त्रस्त झाली आहे. पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटल्याची माहिती मिळताच कर्नाटकातल्या कलबुर्गी येथील नागरिकांनी या टँकरच्या अवतीभोवती गर्दी केली. फुकट पेट्रोल मिळेल म्हणून या हे नागरिक टँकरच्या दिशेने बादल्या, बादल्या आणि टमरेल घेऊन पळत सुटले.

कर्नाटकच्या कुलबुर्गी येथील जेवार्गी महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पटली झाला. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची गळती होत असल्याची माहिती आसपासच्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. मग काय एक नाही दोन नाही तर सारे गावच फुकट पेट्रोलसाठी धावत सुटले. घरामधून जे काही मिळेत अगदी पाण्याच्या बादल्या, बाटल्या आणि टमरेल घेऊन पेट्रोल भरायला तुटून पडले.

First Published on: September 1, 2018 6:26 PM
Exit mobile version