रेल्वेचा भोंगळ कारभार, मजूर हैराण.. ३० तासाच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस!

रेल्वेचा भोंगळ कारभार, मजूर हैराण.. ३० तासाच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस!

देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांना आपली गावी सोडण्यासाठी सद्या श्रमिक विषेश रेल्वे सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर देशभरात मेस एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. १ जूनपासून २०० स्पेशल गाड्या वेळापत्रानुसार सोडल्या जाणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. त्यानसार सध्या देशभरात अडकेलेल मजूर, विद्यार्थी आपल्या घरी पोहचत आहेत. मात्र या ट्रेनबाबत काही घटना समोर येत आहेत. रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका मजुरांना बसत आहे. कारण काही ट्रेन प्रचंड उशीराने आपल्या गंतव्य स्थानी पोहचत आहेत.

यातील एका रेल्वेने ३० तासांच्या प्रवासासाठी तब्बल ४ दिवस लावले आहेत. त्यामुळे ४ दिवस भूक, पाणी आणि गरमीने मजुर अक्षरश: हैराण झाले. काही ठिकाणी मजुरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गोंधळही केला. दिल्लीपासून बिहारच्या मोतीहार येथे जाणारी ट्रेन ४ दिवसानंतर समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवाशासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेला ४ दिवस लागले. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. याच रेल्वेत एक गरोदर महिला होती. तीला त्रास होऊ लागल्याने तीला उतरवण्यात आले. महिलेने प्लॅटफॉर्मवर मुलीला जन्म दिला. नंतर तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र मार्ग मोकळा नसल्यामुळे रेल्वेचे मार्ग बदलले जात आहेत.

३६ तासाच्या प्रवासाला ७० तास

त्याचप्रमाणे समस्तीपूर पोहचलेल्या आणखी एक ट्रेनमधील प्रवाशाने पुण्याहून ट्रेन पकडली. २२ तारखेला ही ट्रेन निघाली. छत्तीसगड,ओडिसा, पश्चिम बंगाल, करत २५ मे ला ट्रेन दुपारी समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासाला ३६ तास लागतात तीथे ७० तासानंतर संपूर्ण बारताची सैर करून समस्तीपूरला पोहचली.


हे ही वाचा – TikTok : मुलीचे झाले ४ मिलियन फॉलोअर्स, भाजप नेता केक घेऊन पोहोचला घरी


 

First Published on: May 27, 2020 12:16 PM
Exit mobile version