आता मोबाईल घेणे शक्य; Amazon, Flipkart ला रेड झोनमध्ये डिलिव्हरीची परवानगी!

आता मोबाईल घेणे शक्य; Amazon, Flipkart ला रेड झोनमध्ये डिलिव्हरीची परवानगी!

Amzon

लॉकडाऊन ४ मध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल अशा कंपन्यांना सुट मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ई कॉमर्स कंपन्यांना होम डिलव्हरीसाठी रेड झोनमध्येही परवानगी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन ४ च्या मार्गदर्शक सुचनांमुळे ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मोबाईल खरेदीकरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. आता लॉकडाऊनमध्येही ग्राहक मोबाईल ऑर्डर करू शकतात.

देशातील बहुतेक मेट्रो शहरे आणि मोठी शहरे रेड झोनमध्ये येतात. त्यामुळे या आधी ई-कॉमर्स कंपन्या केवळ निवडक ठिकाणीच डिलिव्हरी करत होत्या. पण आता लॉकडाउन ४ मध्ये, केंद्रीय गृह मंत्रालयाला ई-कॉमर्स कंपन्यांनी रेड झोनमध्ये अनावश्यक वस्तूंच्या वितरणाची परवानगी दिली आहे.

मोबाईल ग्राहकांना दिलासा

ऑनलाईन खरेदीमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उत्पानदांची मागणी सर्वाधिक आहे. बऱ्याचश्या स्मार्टफोन कंपन्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे केवळ त्यांच्या वस्तू विकतात. त्यामुळे जे ग्राहक मोबाईल खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांना मोबाईल खरेदी करता येणार आहे.

अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी मेट्रो शहर एक मोठी बाजारपेठ आहे. या कंपन्यांच्या ७० टक्के ऑर्डर या मोठ्या शहरांतून मिळतात. पण देशातील बरीच मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत, त्यामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. पण लॉकडाउन ४ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल अशी अपेक्षा आहे.


हे ही वाचा – लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात होते ६०६ रुग्ण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या ९० हजार!


 

First Published on: May 18, 2020 12:08 PM
Exit mobile version