Coronavirus: लॉकडऊनने करोनाला रोखता येणार नाही…!

Coronavirus: लॉकडऊनने करोनाला रोखता येणार नाही…!

जगातील प्रत्येक देशावर कोरोना विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. भारतात सध्या करोना दुसर्‍या टप्प्यावर आहे आणि तिसर्‍या टप्प्यात पोहचू नये म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय भारताने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, देशात लवकरच लॉकडाउन केले आहे जे कौतुकास्पद पाऊल आहे. तथापि, यासह काही अन्य निर्णय देखील घ्यावे लागतील. कारण केवळ लॉकडाऊने करोनाचा धोका टळणार नाही, असे WHO ने म्हटले आहे.

लॉकडाउन हा चांगला निर्णय आहे, असे WHOचे डॉ. रायन म्हणाले. आता भारताला आणखी एक काम करावे लागेल. जो कोणी पीडित व्यक्तीच्या संपर्कात आला आहे, त्याला निरीक्षणाखाली ठेवावे लागेल. जर हे सर्व घडले तर करोना वाढण्यास रोखता येईल. ते पुन्हा म्हणाले की, भारताने जगाला पोलिओपासून मुक्त केले आहे, अशा परिस्थितीत ते करोनावरही चमत्कार करु शकतात.


हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचं थैमान; दिवसरात्र येतोय केवळ अँबुलन्सचा आवाज

WHOचे अध्यक्ष डॉ. ट्रेडोस म्हणाले की, “करोनाला हरविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. भारताने आधीच लॉकडाउन केले ही खूप चांगली गोष्ट आहे. तिसर्‍या टप्प्याबाबत WHOचे अध्यक्ष म्हणाले की, ज्या देशांमध्ये योग्य वेळी कठोर निर्णय घेतले जात नाहीत आणि खबरदारी घेतली जात नाही अशा परिस्थितीत याचा वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत प्रत्येकासमोर योग्य पावले उचलण्याचे आव्हान असते.

लॉकडाऊनबाबत डॉ. मारिया व्हॅन म्हणाल्या की, काही वेळा लॉकडाऊन लावून आपण त्यातून मुक्त होऊ शकतो असे नाही. आपल्याला आपली योजना पुढे बदलावी लागेल. आणि जिथे जास्त प्रकरणे आहेत तिथे काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत चीन आणि सिंगापूरचे मॉडेल अवलंबले जाऊ शकते. कारण वेगवेगळ्या क्षेत्रात बरेच निर्णय घेतले जातात.

 

First Published on: March 26, 2020 10:16 AM
Exit mobile version