लॉकडाऊन- १५ लाख हॉटेल कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड?

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. जर हा अनुमान खरा ठरला तर देशातील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता असून १५ लाख कर्मचारी बेरोजगार होतील अशी शक्यता नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) व्यक्त केली आहे.

तसेच यामुळे हॉटेल क्षेत्रातील ५ लाख सदस्यांना २०२० मध्ये ८० हजार कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. लॉकडाऊनमुळे आधीच स्विगी व झॉमेटो या फूड डिलिवरी कंपन्याचा व्यवसाय ९० टक्के घटला आहे. यामुळे NRAI ने घरमालक , मॉल व इतर मालकांना हॉटेल मालकांकडून भाडे व मेटेन्सन्स मागू नये अशी विनंती केली आहे.

देशात ९० टक्के हॉटेल्स हे भाडेतत्वावर चालतात. फक्त २० टक्के हॉटेल्स हे मॉल्समध्ये चेनच्या द्वारे सुरु आहेत. इतर हॉटेल्स हे रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. या हॉटेल्सना दरमहा उत्पन्नाच्या १५ ते ३० टक्के रक्कम भाडेतत्वावर द्यावी लागते. तर मॉलमध्ये हे चार्ज मेटेनेन्स व हॉटेल्सच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. पण आता हे सगळे व्यवसायच ठप्प झाले आहेत. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास १५ लाख हॉटेल कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असे NRAIने म्हटले आहे. NRAI चे अध्यक्ष अनुराग कटीयार यांनी कोरोनोनंतर जगभरात कल्पनेच्या पलिकडची अवस्था होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. ज्यावेळी आर्थिक स्थिती चांगली असते तेव्हाच लोक खाण्यापिण्यावर खर्च करतात. पण कोरोनाच्या दहशतीमुळे लोक बाहेरचे खाणेच बंद करण्याचा अंदाज आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी चीनमध्ये कोरोनाच्या कहरा
नंतर जीवन सर्वसामान्य झाले असले तरी डॉमिनोज पिज्जाची विक्री अजूनही घटलेलीच असल्याचे सांगितले आहे. हेच भारतातही होण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

First Published on: April 2, 2020 3:12 PM
Exit mobile version