शिव्या धमक्यांना घाबरायला मी ‘जायरा वासीम’ नाहीये – बबीता फोगट

शिव्या धमक्यांना घाबरायला मी ‘जायरा वासीम’ नाहीये – बबीता फोगट

या कोरोना व्हायरसच्या काळात कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबीता फोगट यांच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बबीता फोगट यांनी तबलीगी जमातींवर ट्वीट केल्यामुळे एक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बबीता फोगट यांना नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं होतं. मात्र ट्रोल झाल्यानंतरही बबीता फोगट यांनी आपण आपल्या ट्वीटर कायम असल्याचं म्हटलं आहे, मी माझं ट्वीट डिलीट करणार नाही, ज्यांना खरं ऐकण्यात अडचण आहे, त्यांनी खरं ऐकायची सवय करून घ्या.

हरियाणामध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २०७ झाला आहे. यामध्ये १२१ लोकं तबलीगी जमातींच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बबीता फोगट म्हणाल्या, ‘मी काही दिवसांपूर्वी मी ट्वीट केलं होतं. यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रीया उमटायला लागल्या. अनेकांनी मला शिव्या दिल्या, फोन करून धमकी दिली. अशा लोकांना एकच सांगेन, मी काही जायरा वासीम नाहीये, जी तुमच्या धमक्या ऐकून घरात बसेन, मी बबीता फोगट आहे, मी देशासाठी लढले आहे आणि आयुष्यभर लढत राहेन.

कारण मी ट्वीटमध्ये काहीच चुकीच लिहीलं नव्हतं.  मी माझ्या बोलण्यावर कायम आहे. मी अशा लोकांबद्दल बोलले आहे ज्यांनी कोरोना पसरवला आहे. तुम्ही मला सांगा तबलिगी जमातीच्या लोकांनी कोरोनाचा फैलाव केला? यात ते एक नंबर वर नाहीयेत का? जर त्यांनी कोरोना पसरवला नसता तर लॉकडाऊन कधीच संपले असते आणि कोरोना विरूद्धचे हे युध्द आपण जिंकलो असतो’.

खरं ऐकण्याची सवय करून घ्या

बबीता म्हणाली, जर तुम्हाला खरं ऐकण्यात अडचण येत असेल तर खरं ऐकण्याची सवय करून घ्या. मी कायम खरं बोलत राहीन आणि लिहित राहीन.


हे ही वाचा – एकीकडे हल्ले, तर दुसरीकडे माणुसकी; पोलिसाने शिवले ३ हजार मास्क!


 

First Published on: April 17, 2020 7:56 PM
Exit mobile version