देशातील २० राज्यांमध्ये उद्या होणार मतदान

देशातील २० राज्यांमध्ये उद्या होणार मतदान

लोकसभा २०१९

लोकसभा २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या, ११ एप्रिल रोजी होणार आहेत. तब्बल २० राज्यातील ९१ मतदारसंघात हे मतदान पार पडणार असून महाराष्ट्रातील ७ मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश येथे मतदान होणार आहेत. या सर्व मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा मंगळवार, ९ एप्रिल रोजी थंडावल्या. या सर्व राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. त्यामुळे आता मतदार राजा कोणाला कौल देतो, हे पहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यांमध्ये होणार असून याचा निकाल २३ मे २०१९ रोजी लागणार आहे.

या राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान

  1. आंध्र प्रदेश – २५ मतदारसंघ
  2. अरुणाचल प्रदेश – २ मतदारसंघ
  3. मेघालय – २ मतदारसंघ
  4. उत्तराखंड – ५ मतदारसंघ
  5. मिझोराम – १ मतदारसंघ
  6. नागालँड -१ मतदारसंघ
  7. सिक्किम -१ मतदारसंघ
  8. मणिपूर -१ मतदारसंघ
  9. त्रिपुरा -१ मतदारसंघ
  10. तेलंगणा – १७ मतदारसंघ
  11. लक्षद्वीप -१ मतदारसंघ
  12. अंदमान-निकोबार -१ मतदारसंघ
  13. ओडिशा – ४ मतदारसंघ
  14. आसाम – ५ मतदारसंघ
  15. बिहार – ४ मतदारसंघ
  16. छत्तीसगड – १ मतदारसंघ
  17. जम्मू आणि काश्मीर – २ मतदारसंघ
  18. उत्तर प्रदेश – ८ मतदारसंघ
  19. पश्चिम बंगाल – २ मतदारसंघ
  20. महाराष्ट्र – ७ मतदारसंघ

राज्यात विदर्भातील ७ जागांवर मतदान 

  1. नागपूर
  2. रामटेक
  3. यवतमाळ-वाशिम
  4. चंद्रपूर
  5. भंडारा-गोंदिया
  6. वर्धा
  7. गडचिरोली-चिमूर
First Published on: April 10, 2019 10:29 AM
Exit mobile version