Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

Loksabha Election : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

सातव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे.
A view of the sea
Rashmi Mane

बिहारमधील पटना येथे काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी मतदान केले

Rashmi Mane

पटना येथे सयामी जुळ्या बहिणी सबा आणि फराह यांनी मतदान केले.

Rashmi Mane

दुपारी १ वाजेपर्यंत बिहारमध्ये ३६.२० टक्के, हिमाचल प्रदेश ३४.४७ टक्के, मध्य प्रदेश ४३.८९ टक्के, पंजाब ३६.६६ टक्के, उत्तर प्रदेश ३६.३७ टक्के, पश्चिम बंगाल ४७.५५ टक्के तर चंदिगडमध्ये ३५.६० टक्के मतदान झाले.

Rashmi Mane

लालू प्रसाद यादव याचे सुपूत्र तेज प्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. बिहारच्या पटना येथे मतदान केल्यानंतर परतत असताना हा हल्ला झाला. संतप्त कॅमेरामनने गाडीची काच फोडल्या घटना घडली आहे. या घटनेबाबत तेज प्रताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून हा मला मारण्याचा कट असल्याची प्रतिक्रिया तेज प्रताप यादव यांनी दिली आहे.

Rashmi Mane

बिहारच्या नालंदातील चांदोरा गावात मतदारांचा मतदानावर बहिष्कार

First Published on: May 19, 2019 9:12 AM
Exit mobile version