Politics : फोडाफोडीचे राजकारण? सूरत, इंदूरनंतर आता पुरीयेथील काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार

Politics : फोडाफोडीचे राजकारण? सूरत, इंदूरनंतर आता पुरीयेथील काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दोन टप्पे पार पडले असून उर्वरीत टप्प्यांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. कारण सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर इंदूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला होता. यानंतर आता पुरीयेथील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने पैसे दिलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. (Lok Sabha ELection 2024 Congress candidate Sucharita Mohanty refused to contest from Puri)

काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी आज काँग्रेस पक्षाला तिकीट परत केले असून त्यांनी दावा केला की, त्यांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने पैसे दिले नाहीत. सुचरिता मोहंती यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना ईमेल पाठवला आहे, ज्यात त्यांनी खासदारकीचे तिकीट परत करत असल्याचे म्हटले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सुचरिता मोहंती यांनी लिहिले की, पुरी लोकसभा जागेवर आमचा निवडणूक प्रचार वाईट झाला आहे, कारण पक्षाने मला निवडणुकीसाठी निधी देण्यास नकार दिला होता. ओडिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार यांनी मला निवडणूक प्रचाराचा खर्च स्वत: उचलण्यास सांगितले, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राहुल गांधींच्या भूमिकेचं विनोद पाटलांकडून स्वागत

सुचरिता मोहंती म्हणाल्या की, मी एक पत्रकार होती आणि 10 वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झाली. मी माझी सर्व ताकद निवडणूक प्रचारात लावली आणि निवडणूक प्रचारासाठी लोकांकडून देणग्या घेण्याचाही प्रयत्न केला, पण त्यातही यश आले नाही. संपूर्ण लोकसभा जागेवर प्रभावी प्रचार करता यावा यासाठी पक्षाच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही मी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला केले होते. पुरी लोकसभा जागा जिंकण्यापासून केवळ निधीची कमतरता आम्हाला रोखू शकते, कारण मी स्वत:च्या बळावर निवडणूक प्रचार सुरू ठेवू शकत नाही. त्यामुळे मी पक्षाचे तिकीट परत केले आहे. दुसरे कारण सांगायचे तर पुरी लोकसभेच्या 7 विधानसभा जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले नाही. कमकुवत उमेदवारांना तिकीट देण्यात आले, अशा स्थितीत मी ही निवडणूक लढवू शकत नाही, असेही सुचरिता मोहंती यांनी म्हटले.

हेही वाचा – Politics : शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना काढलं खोलीच्या बाहेर? व्हिडीओ होतोय व्हायरल

Edited By – Rohit Patil

First Published on: May 4, 2024 7:35 PM
Exit mobile version