पाचव्या टप्प्यात देशभरात ६२.५६ टक्के मतदान

पाचव्या टप्प्यात देशभरात ६२.५६ टक्के मतदान

सातव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील देशातील सात राज्यांमध्ये ५१ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जयंत सिन्हा, राजवर्धनसिंह राठोड, अर्जुनराम मेघवाल आणि कृष्णापल गुर्जर यांच्यासह अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात निश्चित होणार असल्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त होणार आहे.
A view of the sea
Pradnya Ghogale

देशभरात ६२.५६ टक्के मतदान

५ वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी


झारखंड – ६३.७२ टक्के

पश्चिम बंगाल – ७३.९७ टक्के

मध्य प्रदेश – ६२.६० टक्के

उत्तर प्रदेश – ५७.३३ टक्के

बिहार – ५७.८६ टक्के

राजस्थान – ६३.७५ टक्के

४ वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी

झारखंड – ५८.०७ टक्के

मध्य प्रदेश – ६२.५१ टक्के

बिहार – ४४.८ टक्के

जम्मू काश्मीर – १५.५१ टक्के

उत्तर प्रदेशात – ४४.८९ टक्के

पश्चिम बंगालमध्ये – ६३.५७ टक्के

राजस्थान – ५०.४४ टक्के

३ वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी

झारखंड – ५८ टक्के

मध्य प्रदेश – ५०.५० टक्के

बिहार – ४४.२८ टक्के

जम्मू काश्मीर – १५.३० टक्के

उत्तर प्रदेश – ४४ टक्के

पश्चिम बंगाल – ६२ टक्के मतदान

Rashmi Mane

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू महेंद्र सिंग धोनी याने रांची, झारखंड येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी धोनीचे संपूर्ण कुटुंब मतदानासाठी आले होते.

First Published on: May 6, 2019 8:06 AM
Exit mobile version