Loksabha election Live Update: देशात ६३.२४ टक्के मतदान

Loksabha election Live Update: देशात ६३.२४ टक्के मतदान

रिपाईपाठोपाठ ब्राह्मण संघटनातही फूट

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशातील एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील १४, गुजरातमधील २५, केरळच्या २०, बिहारमधील ५, उत्तर प्रदेशातील १०, आसाममधील ४, कर्नाटकातील १४, पश्चिम बंगालमधील ५, ओडिशातील ६, छत्तीसगडमधील ७, गोव्यातील २ आणि दादरा-गनर हवेली, दमण व दीव, जम्मूतील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
A view of the sea
Rashmi Mane

तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले

Rashmi Mane

देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण. यंदा ६३.२४ टक्के मतदान झाले.

Rashmi Mane

देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.३१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Rashmi Mane

देशभरात तिसऱ्या टप्प्यात सुरु असलेल्या मतदानानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत एकून ५१ टक्के मतदान झाल्याचे समजते. यात बिहारमध्ये ४६.९४ टक्के, गुजरात ५०.३७ टक्के, महाराष्ट्र ४४.८० टक्के, गोवा ५८.३९ टक्के, आसाम ६२.१३ टक्के, उत्तर प्रदेश ४६.९९ टक्के, केरळ ५४.९१ टक्के, कर्नाटक ४९.९६ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ६७.५२ टक्के मतदान झाले आहे.

Rashmi Mane

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेता जगदीश शेट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला

First Published on: April 23, 2019 7:53 AM
Exit mobile version