नीरव मोदीची पुन्हा तुरुंगात रवानगी; कोर्टाचा जामीन देण्यास नकार

नीरव मोदीची पुन्हा तुरुंगात रवानगी; कोर्टाचा जामीन देण्यास नकार

पंजाब नॅशनल बँकला कोट्यवधी रुपयांचा नुकसान करून फरार झालेला. पीनबीचा प्रमुख आरोपी नीवर मोदीचा जमीन पुन्हा एकदा वेस्टमिन्स्टर कोर्टने फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणेकडून नीरव मोदीला जामीन मिळू नये यासाठी कणखरपणे आपली बाजू मांडण्यात आली आहे. एक प्रकारे भारतीय तपास यंत्रणेने यश प्राप्त केले आहे. तसेच जेव्हा नीरवचा जामीन फेटाळून लावला तेव्हा ईडी आणि सीबीआय पथकाच्या अधिकाऱ्यांनी अंगठा ही विजयी मुद्रा दाखवली आणि हस्तांदोलन केले. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी २६ एप्रिला होणार आहे, असे लंडनमधील एएनआयच्या प्रतिनिधींकडून समजले आहे.

सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

सुनावणी दरम्यान काही धक्कादायक खुलासे भारताची बाजू मांडणाऱ्या टॉबी कॅडमन यांनी केले आहेत. त्यांनी सांगितले की, नीरव मोदी यांनी यापूर्वी आशिष लाड या साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच नीरव भारतीय तपास यंत्रणेला सहकार्य करत नाही. तर त्याचा जामीन मंजूर व्हावा यासाठी कोणतेही पुरेसे कारणाने नसल्याने त्याचा जामीन फेटाळावा, कारण जर तो तुरुंगाच्या बाहेर आला, तर तो पुरावे नष्ट करू शकतो. तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा यासाठी भारताने बाजू मांडताना म्हटले आहे.

यापूर्वीही याचिका फेटाळली

प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करु, असे सुनावणी पुर्वीच नीरव मोदीच्या वकिलाने सांगितले होते. यापूर्वीही जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा सुनावणीदरम्यान नीरव मोदीची याचिका फेटाळली होती. नीरव मोदीला लंडनमधील स्कॉटलँड यार्डच्या एका बँक शाखेतून अटक करण्यात आली आहे. त्या बँकेत नीरव नवे खाते उघडण्यासाठी गेला होता तिथून त्याला अटक करण्यात आली होती.

First Published on: March 29, 2019 9:48 PM
Exit mobile version