‘रामा’चा भाजप प्रवेश!

‘रामा’चा भाजप प्रवेश!

रामाचा भाजप प्रवेश !

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रामायण या मालिकेतील भगवान रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आता राजकीय क्षेत्रात एण्ट्री केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अरुण गोविल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अरुण गोविल हे बंगाल निवडणुकीत भाजपाच्या बाजूने प्रचार करणार असून गोविल बंगालमध्ये साधारण १०० सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता अरुण गोविल यांनी गुरूवारी दिल्लीच्या भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेतलं. या पक्षप्रवेशावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंग हे उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणूका होणार आहेत. यापूर्वीच लोकप्रिय अभिनेता असलेला अरूण गोविल यांनी आपली राजकीय खेळी सुरू केली आहे. आपले जे कर्तव्य आहे ते आपण केलेच पाहिजे. मला आजच्या आधी कधीच राजकारण समजले नाही, परंतु मोदीजींनी देशाचा ताबा घेतला तेव्हापासून देशाची व्याख्या बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपात प्रवेश घेतल्यानंतर अरूण गोविल यांनी दिली. अरूण गोविल असा अभिनेता आहे, जो ९० च्या दशकात छोट्या पडद्यावरील रामायण या मालिकेतून प्रसिद्ध झाला होता. रामानंद सागर यांच्या ९० च्या दशकात दाखवली जाणारी रामायण ही मालिका आणि त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या धार्मिक मालिकेत भगवान रामाची भूमिका अरूण गोविल या अभिनेत्याने साकारून चाहत्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.

कोण आहेत अरूण गोविल?

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे अरुण गोविल यांचा जन्म झाला. मेरठ विद्यापीठातील जी. एफ शाहजहांपूर महाविद्यालयातून अभियांत्रिकी शास्त्राचा अभ्यास केला. या शिक्षणानंतर अरुण गोविल यांनी काही नाटकात सहभाग घेतला. अरुण गोविल यांचे वडील श्री. चंद्र प्रकाश गोविल हे सरकारी नोकरीत काम करायचे. अरुण गोविल हे सहा भावंडांमधील चौथे होते. अरुण गोविल स्वत: म्हणाले की, ‘मी रामसाठी ऑडिशन दिली होती, पण निर्मात्यांनी मला नकारले. त्यावेळी माझे काम त्यांना आवडले नाही, परंतु नंतर ते स्वत: माझ्याकडे आले आणि मला ही भूमिका ऑफर केली.

First Published on: March 18, 2021 6:03 PM
Exit mobile version