Love You Zindagi म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या त्या तरुणीचा मृत्यू, व्हिडिओ शेअर करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Love You Zindagi म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या त्या तरुणीचा मृत्यू, व्हिडिओ शेअर करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Love You Zindagi म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या त्या तरुणीचा मृत्यू, व्हिडिओ शेअर करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

देशात कोरोनामुळे सगळेच नाकारात्मक भावनेत आहेत. रोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येने लोक हादरुन गेले आहेत. अनेक जण आपल्यापरिने सकारात्मक राहणाच्या सल्ला देत आहेत. तर अनेकांनी आपले चांगले वाईट प्रसंग सांगून रुग्णांना नव्याने उभे राहण्याची उमेद देत आहेत. अशीच नवी उमेद देणाऱ्या, कोरोनाच्या लढ्यात इतरांना प्रेरणा देणाऱ्या ३० वर्षीय तरुणीचा लव्ह यू जिंदगी या गाण्यावरचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आज त्या तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. काल तिचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या डॉ.मोनिका लंगेह यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. ३० वर्षांची तरुणी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने ग्रस्त होती. दिल्लीच्या एका रुग्णालात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची परिस्थिती खूप चिंताजनक होती. या ३० वर्षीय तरुणीला ऑक्सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे तिला कोविड इमरजेंसीमध्ये उपचार सुरु करण्यात आले होते. गेली दहा दिवस ही तरुणी रुग्णालयात उपचार घेत होती. तिला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि प्लाझ्मा थेरपी देखिल देण्यात आली होती. डॉ. मोनिका लंगेह यांनी या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओ कोरोना वॉर्डमध्ये तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेली तरुणी लव्ह यू जिंदगी या गाण्यावर नाचताना दिसली होती.


आयुष्यात कितीही मोठे प्रसंग आले तरी कधीही हिंमत सोडू नका असे म्हणत डॉ. मोनिका यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तिची परिस्थिती इतकी वाईट असताना तिची इच्छाशक्ती प्रचंड होती. तिने आज मला गाण लावायला सांगतिले मी तिला लव्ह यू जिंदगी गाणे लावून दिले. कितीही मोठे संकट आले तरी कधाही हिम्मत सोडू नका ही शिकवण आज मला या तरुणीने दिली आहे, असे म्हणत डॉ. मोनिका यांनी तिचा व्हिडिओ शेअर केला होता.


तरुणीच्या मृत्यूची बातमी ट्विट करण्याआधी डॉ. मोनिका यांनी एक ट्विट केले होते त्यात असे म्हटले होते की, तरुणीला ICU बेड मिळाला आहे मात्र तिची परिस्थिती स्थिर नाही. या शूर मुलीसाठी सर्वांनी प्रार्थना करा. तिची लहान मुलगी घरी तिची वाट पाहत आहे. तरुणीच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या तरुणीची कोरोनाशी झुंज मात्र अपयशी ठरली. अनेक युझर्सनी डॉ. मोनिका यांचे ट्विट शेअर करुन तरुणीला श्रद्धांजली दिली आहे.


 

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, गेल्या २४ तासात २ हजार रुग्णांची नोंद

 

First Published on: May 14, 2021 10:54 AM
Exit mobile version