कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने प्रियकराने केली डॉक्टर प्रेयसीची हत्या

कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने प्रियकराने केली डॉक्टर प्रेयसीची हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाग्रस्त रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर प्रेयसीमुळे (२७) आपल्यालाही कोरोना होऊ शकतो अशी भीती वाटल्याने एका माथेफिरु तरुणाने पेशाने डॉक्टर असलेल्या प्रेयसीची हत्या केली. ही घटना इटलीत घडली असून नुकतेच डॉक्टरी शिक्षण पूर्ण केलेल्या त्या तरुणीने कोरोना रुगांची सेवा करण्यासाठी स्वता:ला वाहून घेतले होते. यामुळे तिची हत्या झाल्याचे कळताच संपूर्ण इटलीत खळबळ उडाली आहे. लॉरेना क्वारंटा असे तिचे नाव आहे. तर अंटोनियो दि पेस असे आरोपीचे नाव आहे.

लॉरेना व अंटोनियो यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित होते. लॉरेना डॉक्टर होती तर अंटोनियो देखील चिकित्सक होता. दोघेही येथील मेसिना सिसली मधील एका रुग्णालयात काम करत होते. लॉरेनाने कोरोना रुग्णांची दिवस रात्र सेवा करत होती. यामुळे तसेच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर कोरोनारुग्णांची सेवा करताना अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. यामुळे लॉरेनालाही कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंटोनियोला संशय होता. तिच्यामुळे आपल्यालाही संसर्ग होईल अशी भीती त्याला वाटू लागली. यामुळे त्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.

First Published on: April 3, 2020 4:17 PM
Exit mobile version