दुष्काळात तेरावा: घरगुती गॅस-सिलेंडर महागले

दुष्काळात तेरावा: घरगुती गॅस-सिलेंडर महागले

गॅस-सिलेंडर (प्रातिनिधिक फोटो)

देशातील सर्वसामान्य लोक सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. अशातच आता दुष्काळात तेरावा म्हणून दिल्लीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडरचेही दर वाढले आहेत. ही दरवाढ २.८९ रुपयांनी झाली असून आता प्रति सिलेंडरचा भाव ५०२.४ रुपये इतका असणार आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना इंडियन ऑईलने सांगितले, की ‘प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या किंमती आणि परकीय चलन विनिमय दरतील चढ-उतार यामुळे सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय २.८९ रुपयांनी प्रति सिलेंडरचे दर वाढण्यामागे जीएसटी हे देखील एक मुख्य कारण असल्याचे इंडियन ऑईल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये ३६७.६० रुपये प्रति सिलेंडर अनुदान जमा करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापर्यंत हे अनुदान ३२०.४९ रुपये इतके होते.


‘सीएनजी’ सुद्धा महागले

राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसोबतच सीएनजीसुद्धआ महागले आहे. त्यामुळे दिल्लीतील सीएनजी वाहनधारकांना आता वाढीव दरात सीएनजी उपलब्ध होणार आहे. १ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सीएनजीच्या प्रति किलोमध्ये झालेली दरवाढ आणि सध्याची वाढलेली किंमत:

First Published on: October 1, 2018 9:21 AM
Exit mobile version