LPG सिलेंडर आजपासून होणार महाग; जाणून घ्या नवे दर

LPG सिलेंडर आजपासून होणार महाग; जाणून घ्या नवे दर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला सामान्य माणसाला मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांच्या घराचे बजेट कोलमडले आहे आणि यामुळे सामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाले आहे.

यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. अवघ्या १५ दिवसात विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. अनुदानाशिवाय १४.२ किलो गॅस सिलेंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आहे. त्याचबरोबर १९ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलेंडर ८८४.५ रुपये झाले आहे. तर पूर्वी ते ८५९.५० रुपये होते. या नव्या दरानुसार दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर ८८४.५ रुपये, मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर ८८४.५ रुपये, कोलकातामध्ये ९११ रुपये तर चेन्नईत ९०० रुपये असे आहेत.

दरम्यान, वर्षाच्या सुरूवातीला जानेवारीमध्ये दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला किंमत वाढवून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. जर तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत जाणून घ्यायची असेल तर तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईट https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वर भेट द्या. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात.


 

 

First Published on: September 1, 2021 10:34 AM
Exit mobile version