LPG Subsidy : आता गरीबांनाच मिळणार गॅस सिलेंडवरील सबसिडी

LPG Subsidy : आता गरीबांनाच मिळणार गॅस सिलेंडवरील सबसिडी

LPG Subsidy : गॅस सिलेंडरवर subsidy चेक करण्याच्या सोप्या स्टेप्स

देशात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही सतत भाववाढ केली जात आहे. दरम्यान मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या प्रत्येकाला योग्य दरात मिळावा यासाठी त्यावर सबसिडी सुरु केली होती. मात्र यापुढे देशातील फक्त गरीब नागरिकांनाच सबसिडी देण्याचा मोदी सरकारचा विचार सुरु आहे. त्यामुळे एलपीजी सिलेंडर देखील सर्वसामान्यांसाठी महाग होणार आहे. मात्र सरकारच्या तिजोरीत भर पडणार आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरचं देश पातळीवर यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरवरील सबसिडीसंदर्भात केंद्र सरकार दोन पर्यायांवर विचार करत आहे. यात पहिला म्हणेज ही सबसिडी सुरु ठेवायची आणि दुसरा म्हणजे उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गालाच सबसिडी द्यायची. मात्र सबसिडी देण्यासंदर्भात अजूनही काही स्पष्ट करण्यात आले नाही. यात 10 लाख रुपये उत्पन्नाचा निकष कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसाठी ही योजना कायम राहण्याची शक्यता आहे. इतर सर्वांसाठी मात्र सबसिडी संपुष्टात येण्याचीच दाट शक्यता आहे.

केंद्राकडून सबसिडी बंद

गॅस सिलेंडरच्या दिवसेंदिवस किंमत वाढत असतानाही केंद्र सरकारने सबसिडी बंद करण्याचा विचार केलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. २०२०-२१ साली पहिल्या चार महिन्यात सरकारनं गॅसच्या सबसिडीवर १६, ४६१ रुपये खर्च केले होते. तर या वर्षी पहिल्या चार महिन्यांत केवळ १२३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांना आता एका गॅस सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात.

सिलेंडरच्या दरात सर्वाधिक वाढ

गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. २०१४ मध्ये १४.२ किलोचा सिलेंडर ४१०.५ रुपये किंमतीला मिळत होता. मात्र आता त्याच सिलेंडरसाठी तब्बल ८८४.५० रुपय़े मोजावे लागत आहेत.

यंदा सिलेंडरच्या दरात १९० रुपयांनी वाढ

जानेवारी २०२१ मध्ये एलपीडी सिलेंडरची किंमत ६९४ रुपय़े होती. आता सिलेंडरची ८८४.५० रुपये झाली आहे. त्यामुळे जानेवारीपासून ते आत्तापर्यंत घरगुती गॅस सिलेंडर जवळपास १९०.५० रुपयांनी महागला आहे.


 

First Published on: October 19, 2021 9:10 AM
Exit mobile version