UP : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ!

UP : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ!

योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री निवासस्थान आणि उतर काही महत्त्वाची ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एका कॉलसेंटवर ही धमकी देण्यात आली होती. या गोष्टीने तातडीने दखल घेत प्रशासनाने मुख्यमंत्री निवासस्थान, ५ कालिदास मार्गाची सुरक्षा वाढविली आहे. बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार या आधी सीएम योगी यांना धमकी दिल्याबद्दल मुंबईतील एका तरूणालाही अटक करण्यात आली होती. यूपी पोलिसांना धमकावणाऱ्याला महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एसटीएफने अटक केली.

या अटकेनंतर यूपी पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला नवी धमकी मिळाली आहे, या धमकीत  मुंबईहून अटक केलेल्या तरूणाला सोडा अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी देण्यात आली होती. या तरुणालाही नंतर महाराष्ट्र एटीएसने अटक केली. या २० वर्षीय युवकास नाशिक येथून अटक करण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २२ मेला लखनऊ पोलीस मुख्यालयात काम करणार्‍या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन केला होता आणि बॉम्बस्फोटात त्यांनी उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांची हत्या करणार असल्याचे सांगितले होते. या धमकी देणाऱ्या विरोधात गोमती नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – सरकारचा निर्णय; कर्नाटकात ५वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद


 

First Published on: June 12, 2020 5:49 PM
Exit mobile version