‘कांदे जमिनीवर येतात की खाली हेही राहुल गांधींना माहिती नाही!’

‘कांदे जमिनीवर येतात की खाली हेही राहुल गांधींना माहिती नाही!’

'कांदे कसे उगवतात माहितीये का?'

जसजशी २०१९च्या निवडणुकांची वेळ जवळ येत जात आहे, तसतसा काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, टोमणे, दावे-प्रतिदावे यांना ऊत यायला लागला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे. ‘राहुल गांधीं म्हणतात मी पंतप्रधान होण्यासाठी तयार आहे, पण त्यांना साधे मिरची आणि कांद्याची शेती कशी होते हे तरी माहिती आहे का?’, असा टोमणा शिवराज सिंह चौहान यांनी मारला आहे. उत्तर प्रदेशच्या मंदसौरमध्ये राहुल गांधींनी गेल्या महिन्यात भेट दिली होती. तिथल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची त्यांनी यावेळी भेट घेतली. या भेटीवर एका सभेदरम्यान चौहान यांनी हा टोमणा मारला आहे.

एक भैया (राहुल गांधी) नुकतेच मंदसौरला भेट देऊन आले. ते म्हणतात ते पंतप्रधान होण्यासाठी तयार आहेत. पण तुम्हाला पंतप्रधान करतंय कोण? त्यांना तर हेही माहिती नसेल की मिरची किंवा कांदा हे नक्की जमिनीतून वर उगवतात की जमिनीत!

शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

शेतकरी कुटुंबियांची घेतली भेट

जून महिन्यात राहुल गांधींनी मंदसौर जिल्ह्याला भेट दिली होती. मागील वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी यावेळी भेट दिली.

काँग्रेस कमबॅक करणार का?

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी मध्यप्रदेशमध्ये उज्जैनपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात पूजा केली. मध्य प्रदेशच्या एकूण २३० विधानसभा मतदार संघांमधून ही यात्रा जाणार आहे. मतदारांसोबत संपर्क साधण्यासाठीच या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे भाजप सलग चौथ्यांदा मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकण्याची तयारी करत असतानाच दुसरीकडे काँग्रेस १५ वर्षांनंतर राज्यात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे.

First Published on: July 15, 2018 1:15 PM
Exit mobile version