‘दाढी वाली मॉडेल’ म्हणते स्वत:वर प्रेम करा!

‘दाढी वाली मॉडेल’ म्हणते स्वत:वर प्रेम करा!

beard women

पूर्वीपासून जगभरात फॅशन जोरात सुरू आहे. दिवसेंदिवस नवनवे फॅशन ट्रेंड बाजारात येत असतात. बऱ्याचदा यातूनच सौंदर्य प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही प्रत्येकाची सौंदर्याची परिभाषा ही वेगळी असते. अशातच फॅशनसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘ग्लॅमर’ या मासिकाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपल्या मासिकाचे ११ डिजिटल मुखपृष्ठ प्रसिद्ध केले आहेत. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि खऱ्या सौंदर्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी या मासिकाने हे मुखपृष्ठ प्रसिद्ध केले आहेत. यावर वेगवेगळ्या मॉडेलचे फोटो लावण्यात आले आहेत.

सौंदर्याचे तथाकथिक नियम नाकारणाऱ्या मॉडेल!

या मॉडेलपैकी एकीच्या चेहर्‍यावर वयाच्या १६ व्या वर्षापासूनच दाढी आहे! अशी एक मॉडेल आहे जिच्या भुवया जोडल्या गेलेल्या आहेत. ‘ग्लॅमर’ने त्यांच्या फेब्रुवारीचा अंक ‘स्वत:वर प्रेम करा’ अशा संकल्पनेवर आधारित तयार केला आहे. ज्या महिलांनी समाजातल्या टिपिकल सौंदर्याच्या नियमांचे पालन करण्यास नकार दिला आणि स्वत:चे नियम बनविले, अशा काही महिलांना या मुखपृष्ठावर स्थान दिले गेले आहे. या मासिकाच्या एका मुखपृष्ठावर अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या कॅटी पाइपर आणि दुसऱ्या मुखपृष्ठावर मॉडेल जेयझा गॅरी, जिची त्वचा दर दोन आठवड्यांनी निघून जाते अशा दोघींना स्थान दिले आहे.

हरनाम कौरला वयाच्या १६ व्या वर्षापासून पॉलिस्टिक अंडाशय सिंड्रोममुळे दाढी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ती समाजातील सुंदरतेची व्याख्या बदण्यासाठी प्रयत्न करू लागली. वेगवेगळ्या मंचाद्वारे ती सौंदर्याच्या परिभाषेबद्दल सांगू लागली.

सोफिया हादजीपंटेली या मॉडेलच्या जोडलेल्या भुवया नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. २०१७ मध्ये याच विषयाला घेऊन तिने एक मोहीम राबवली होती. या मोहिमेला तिने #unibrowmovement असे नाव दिले होते. ती म्हणते, ‘लहानपणापासूनच मी पाहत आहे की लोक त्यांच्या शरीरावरचे केस काढून टाकण्याकडे तसेच भुवयांना आकार देण्याकडे खूप लक्ष देतात. मला मात्र माझ्या या जोडलेल्या भुवया फार आवडतात’.

जेयझा गॅरी ही उत्तर कॅरोलिनाची रहिवासी आहे. ती एका त्वचा विकाराने पीडित आहे. या विकराला ‘लैमेलर इचथ्योसिस’ असे म्हणतात. यामध्ये दर दोन आठवड्यांनी तिची त्वचा निघते आणि नवीन त्वचा येते.

कॅटी पाइपर ही मॉडेल अ‍ॅसिड अटॅकला बळी पडली आहे.

First Published on: February 19, 2020 4:49 PM
Exit mobile version