Live Update: ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला

Live Update: ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला
ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला हल्ल्यात ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल गंभीर जखमी शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं शिवेसेनेच्या शाखेतच धारदार शस्त्रांनी विभाग प्रमुखावर हल्ला
राज्यात गेल्या २४ तासात ५ हजार ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३८० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासात २१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
भारतीय संघ अवघ्या ७८ धावांत ऑल आऊट रोहितची १९ तर रहाणे १८ धावांवर बाद टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांत गारद
राजस्थानमध्ये वायुदलाच्या मिग-२१ बाइसन विमानाचा अपघात प्रसांगावधानामुळे वाचला पायलट बचावला
आगामी पालिका निवडणुका एक सदस्यी प्रभाव पद्धतीनं होणार प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे पालिकांना आदेश ११ पालिकांच्या आगामी निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत मोडीत निघणार
कधी कोथळा काढणार? आयुष्यात उंदीर नाही मारलायं, ते कसले कोथळे काढतायत. त्याला दाखवावा लागले कोथळा कसा असेल? – नारायण राणे यांचं संतोष बांगर यांना उत्तर
जनआशीर्वाद यात्रेमधील प्रतिसाद पहावला नाही, त्यामुळे हे असे झाले – नारायण राणे
पश्चिम बंगालमधील परिस्थिती महाराष्ट्रात भाजप होऊ देणार नाही – नारायण राणे
आता जपून पावले टाकली पाहिजेत – नारायण राणे
तुम्ही कोण माझं काही करू शकतं नाही, तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सगळ्यांना मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली यात माझा मोठा सहभाग आहे. – नारायण राणे
‘थोबाडं फोडा’ असा शब्द वापरणं गुन्हा नाही का? – नारायण राणे
सेनाभवनबद्दल अशी भाषा बोलेल त्याचा थोबाडं फोडा, हा क्राईम नाही का? – नारायण राणे
मी असं काय बोलो होतो, जे राग आला – नारायण राणे
काही जण माझ्या चांगुलपणा आणि मैत्रिचा फायदा उचलत आहेत, हे मला समजलं आहे – नारायण राणे
हायकोर्टात माझ्या बाजूने निकाल लागल्यामुळे देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालं – नारायण राणे
नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
नारायण राणे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कणकवलीतील घरावर हल्ला करण्यात आला आहे. हरकूळ इथल्या परब यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून बाटल्य फेकण्यात आल्या. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने अनर्थ टळला.
नारायण राणे यांच्या याचिकेवर दुपारी २.३० वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे. नारायण राणे यांच्याविरोधात पुणे, नाशिक, महाड आणि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेच गुन्हे रद्द करण्याची मागणी नारायण राणे यांनी याचिकेद्वारे केली आहे.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे जुहूतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी ४ वाजता त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे आता अटकेनंतर नारायण राणे आज काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नारायण राणे यांच्या याचिकेवर थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात सुनवाणी सुरू होणार आहे. या सुनावणीआधी राणेंची वकिलांसोबत सल्लामसलत केली. आता राणेंसोबत सल्लामसलत करून वकिलांची टीम बाहेर पडली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ५९३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३४ हजार १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २५ लाख १२ हजार ३६६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३५ हजार ७५८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १७ लाख ५४ हजार २८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख २२ हजार ३२७ जणांवर उपचार सुरू आहेत.
नारायण राणे यांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईत २६ आणि २७ ऑगस्ट दरम्यान काही शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात येणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूरमधील पंपिंग स्टेशनवर ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याची काम करणार आहे. त्यामुळे उद्यापासून ते शुक्रवार पर्यंत पश्चिम उपनगरांसह शहर भागातील एफ/दक्षिण आणि एफ/ उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल आणि एन विभागात होणार पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेने स्वतः ट्वीट करून दिली आहे. (सविस्तर वाचा)
समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळानं वयाच्या ८१ व्या वर्षी गेल ऑम्वेट यांनी अखेरचा श्वास घेतला. स्त्री-मुक्ती, आदिवासी चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे.
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा १०० कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं आहे. अखेर सत्याचाच विजय झाला अशा आशयाचं ट्वीट नारायण राणेंकडून करण्यात आलं आहे. नारायण राणे मुंबईत दाखल झाले असून उद्यापासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळताच अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. काही ठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून, देवाला नारळ अर्पण करून जल्लोष करण्यात आला.  
First Published on: August 25, 2021 11:03 PM
Exit mobile version