Live Update: भारताचा इंग्लंडवर शानदार विजय, भारताची २-१ अशी खेळी

Live Update: भारताचा इंग्लंडवर शानदार विजय, भारताची २-१ अशी खेळी
भारताचा इंग्लंडवर शानदार विजय, भारताची २-१ अशी खेळी, ओव्हलवर ५० वर्षानंतर भारताचा विजय ओव्हल कसोटीत १५७ धावांनी विजय
मुंबईत २४ तासात ३७९ कोरोनाबाधितांची नोंद, ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
निकाल विरोधात लागला तर विरोधकांना घोळ वाटतो – चंद्रकांत पाटील बेळगाव झाकी है मुंबई अभी बाकी है – बेळगाव विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
बेळगावात मराठी माणसाचा पराभव, महाराष्ट्रात पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे – राऊत बेळगावात मराठी माणसाने बलिदान दिलं आहे. १०५ हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हारल्यामुळे लाज नाही वाटत तुम्हाला, राजकारण बाजूला ठेवा पण मराठी माणूनस म्हणुन तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे खडेबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहेत.
बेळगाव महापालिकेत भाजपची सत्ता, भाजपला मिळाल्या सर्वाधिक ३६ जागा
आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३८,९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांत २१९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३,९०३ रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ,  चाकरमान्यांना गैरसोय होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंची घोषणा
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली
औरंगाबादमध्ये मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी मनसे आज तीव्र आंदोलन करणार आहेत. औरंगाबाद शहरातील गुलमंडी वरल्या सुपारी हनुमान मंदिर समोर हे आंदोलन होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घंटानाद आंदोलन करणार आहेत. यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अनिल देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
करूणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे -देवेंद्र फडणवीस
ED ने मनी लाँडरिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.
बेळगाव महापालिकेचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून २१ मराठी भाषिक उमेदवार रिंगणात
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल ब्राम्हण समाजाविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिकमध्ये भाजप सेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू असून शिवसेना नगरसेवकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन भाजपाला दणका देण्यासाठी प्रलंबित विषय परस्पर मार्गी लावण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. झालेल्या या भेटीनंतर नोकरभरती आणि इतर विषय तात्काळ निकाली काढण्याचे एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिले आहे.
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नव्या रुग्णांना भरती करण्यासाठी जागा नसल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्यानं दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
First Published on: September 6, 2021 4:47 AM
Exit mobile version