Live Update: सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधितांची नोंद

Live update Mumbai Maharashtra

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली तर २ हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत २ लाख १७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २ हजार ७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधित आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आता मालेगावमधील शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांचा देखील कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री सामान्य रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीमती बच्छाव यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र तीव्र लक्षणे नसल्याने घरातच त्या क्वारंटाईन असताना त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांचे निधन झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधणार
सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर केल्यानंतर आता भारत बायोटेकने देखील कोवॅक्सीन लसीचे नवे दर जाहीर केले आहेत. राज्यांना कोवॅक्सिनचा एक डोस आता ६०० रुपयांना मिळणार आहे, तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारला कंपनी केवळ १५० रुपयांना विकणार आहे. लसींच्या नव्या दरामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
First Published on: April 25, 2021 8:55 AM
Exit mobile version