Live Update : गुलाबराव पाटील ४ आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल

Live Update : गुलाबराव पाटील ४ आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल

Live update Mumbai Maharashtra

गुलाबराव पाटील ४ आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल नाना पटोले घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा मातोश्रीवर शिवसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री आजच वर्षा बंगला सोडणार, शिवसैनिकांची वर्षाबाहेर गर्दी शिंदेंनी लिहिलेल्या पत्रावरील सही माझी नाही, नितीन देशमुखांचा दावा राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या बैठक मुख्यमंत्री पदी राहायची माझी इच्छा नाही मी आताही पदावरून पायउतार व्हायला तयार आहे मी राजीनाम्याचं पत्र लिहून ठेवतो, ते तुम्ही या आणि राज्यपालांकडे घेऊन जा …तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे काँग्रेस-राष्ट्रावादीला मी मुख्यमंत्री म्हणून हवा असलो तरी माझ्या माणसांना मी मुख्यमंत्री पदी नकोय राजकारण कुठेही वळण घेऊ शकतो नंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा विधानसभेत हिंदुत्त्वावरून बोलणारा मी एकमेव मुख्यमंत्री शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले शब्द आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच जनतेशी संवाद साधणार एकनाथ शिंदे सात वाजता पत्रकार परिषद घेणार, राज्याचं लक्ष उद्धव ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून ५ वाजता जनतेशी संवाद साधणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात निवासस्थानी वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ तसेच काँग्रेसचे आमदार यांची बैठक पार पडली.
शिंदे गटाकडून विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी भर गोगावले यांची नियुक्ती, एकनाथ शिंदेंची ट्विटद्वारे माहिती
शिवसेनेच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास स्वच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडा, शिवसेनेचा शिंदेंना शेवटचा इशारा
राज्य मंत्रिमंडळाची अतिमहत्त्वाची बैठक संपली
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॅायल स्टोन निवासस्थानी कमनाथ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक. मात्र आठ आमदार बैठकीला उपस्थित नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लागण
दरेकर, महाजन, दानवे फडणवीसांच्या घरी दाखल
उदय सामंत, अनिल देसाई वर्षावर दाखल
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, संजय राऊतांचे सुचक ट्विट
प्रवीण दरेकर, महाजन फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपस्थिती, फडणवीसांना पक्षश्रेष्ठींकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश
काही गैरसमज झालेत ते दूर होतील- संजय राऊत सकाळी एकनाथ शिंदेंशी बोलणं झालं, सगळं सुरुळीत – संजय राऊत राज्यपालांना कोरोनातून बरं वाटू द्या, मग बघू संख्याबळ, संजय राऊतांचा टोला
गोव्याकडे कार्यभार सोपवला जाणार नाही, राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्कात राहणार, राजभवनातून स्पष्टीकरण
एकनाथ शिंदेंची आमदारांसोबतची बैठक सुरु, गुवाहाटीतील रेडीसन हॉटेलमध्ये बैठक
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या भेटीला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात केले दाखल
एकनाथ शिंदे यांची आमदारांसोबत सकाळी ९ वाजता बैठक
कमलनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलानथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ताज्या राजकीय घडामोडी पाहता त्यांना AICC निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात येत आहे.
दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र आपल्यासोबत एकूण 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे राज्यपालांची घेणार भेट बंडखोर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. शिंदे हे विशेष विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी ते आपल्या आमदारांसह सुरतहून गुवाहाटी येथे पोहोचले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले आहेत.
 
First Published on: June 22, 2022 8:51 PM
Exit mobile version