सेक्स, विस्की, चॉकलेट आणि महात्मा गांधी

सेक्स, विस्की, चॉकलेट आणि महात्मा गांधी

महात्मा गांधी

महात्मा गांधी हे स्पष्ट वक्ता होते. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांची ठोस मते होती. ती त्यांनी वारंवार जाहीररित्या मांडली. डिसेंबर १९३५ मध्ये मारग्रेट सेंगर यांना दिलेल्या मुलाखतीत गांधीजींनी सेक्स, दारू आणि चॉकलेटबद्दल आपली मते मांडली. त्यात ते म्हणतात, ‘महिला आणि पुरूष जेव्हा केवळ शारिरीक संबंधांसाठी एकमेकांच्या संपर्कात रहात असतील तर त्यांच्यात प्रेम नसते. तर ती त्यांची वासना असते. जेव्हा महिला आणि पुरूष परिणाम भोगण्याच्या इच्छेशिवाय शारिरीक संबंध प्रस्थापित करतात तेव्हा त्याला प्रेम नव्हेतर वासना म्हणतात. जर कोणी खरंच प्रेम करत असेल तर त्याने वासनाच्या आहारी न जाता स्वत:ला नियंत्रित करायला हवे. आपल्याकडे कामुकतेला शांत करण्याचे योग्य ज्ञान नाही. पण जेव्हा एक पती असे सांगतो की, आम्ही मुले जन्माला घालणार नाही मात्र शारिरीक संबंध ठेवू, तेव्हा ते कामुकता शांत करण्याशिवाय बाकी काही असूच शकत नाही. जर मुले जन्माला घालायची नाहीत तर शारिरीक संबंधांची गरजच काय?’

‘भूक क्षमवण्यासाठी चॉकलेट खात नाहीत’

मुलाखतीत गांधीजी पुढे म्हणतात, ‘प्रेम तेव्हा वासना बनते जेव्हा आपण आपली कामुकता शांत करण्यासाठी प्रेमाचा वापर करतो. तशीच परिस्थिती जेवणाबद्दलही आहे. जर तुम्ही जेवण आनंद मिळवण्यासाठी करत असाल तर ती केवळ वासना आहे. आपण फक्त आपली भूक क्षमवण्यासाठी चॉकलेट खात नाही.’

विस्कीवर काय म्हणाले होते गांधींजी?

‘आपण आनंदासाठी चॉकलेट खातो, मग डॉक्टरांकडून अ‍ॅण्टीडोट (विष उतरवणारी गोळी) घेतो. तुम्ही जेव्हा डॉक्टरला सांगता की विस्कीमुळे माझा मेंदू काम करत नाही तेव्हा तो तुम्हाला अ‍ॅण्टीडोट देतो. मी माझ्या अनुभवातून सांगतो की, जोपर्यंत मी माझ्या पत्नीकडे कामुकतेने बघेन, जोपर्यंत आमच्यात परस्पर सामंजस्य नसेल. आमचे प्रेम कधीही उच्च स्तरावर पोहचू शकणार नाही. आमच्यात प्रेम नेहमी एकसारखे राहिले. पण जसेजसे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो तितके आम्ही किंबहुना मी संयमित होत गेलो,’ असेही गांधीजींनी त्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

First Published on: October 2, 2019 3:39 PM
Exit mobile version