महेश कुमार जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

महेश कुमार जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

महेश कुमार जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

सरकारने आयडीबीआय बँकेचे एमडी आणि सीईओ महेश कुमार जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केलीय. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. महेश कुमार जैन यांना तीन वर्षांसाठी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. या ट्विटमध्ये महेश कुमार जैन यांची प्रोफाइल देखील शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये महेश कुमार जैन यांची शैक्षणिक पात्रता आणि कार्याबद्दल माहिती दिली आहे.

३० वर्ष बँकिंग क्षेत्राचा अनुभव

महेश कुमार जैन यांचा ३० वर्षांपेक्षा अधिक बँकिंग क्षेत्राचा अनुभव आहे. जैन यांनी एमबीए, एफआरएम आणि वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०१७ मध्ये ते आयडीबीआय बँकेच्या एमडी पदावर होते. महेश कुमार जैन यांचा एग्जिम बँक, एनआईबीएम आणि आईबीपीएसच्या बोर्डमध्ये देखील सहभाग राहिला आहे. त्याचप्रमाणे बँकिंग सेक्टरसंदर्भात तयार केलेल्या अनेक कमिटींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

जैन आरबीआयचे चौथे डेप्युटी गव्हर्नर

आरबीआयमध्ये सध्या तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. महेश कुमार जैन हे चौथे डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत. सध्या गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासोबत डेप्युटी गव्हर्नर म्हणून बी. पी. कानूनगो, विरल वी. आचार्य आणि एन. एस. विश्वनाथ काम करत आहे.

First Published on: June 4, 2018 11:19 AM
Exit mobile version