560 संस्थानांचे देशात विलीनीकरण; ‘एक भारत’ घडवण्यात सरदार वल्लभभाई पटेलांचे मोठे योगदान

भारताचे लोहपुरुष अशी ख्याती असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 72वी पुण्यतिथि आहे. 15 डिसेंबर, 1950 रोजी प्रर्दीघ आजारानंतर हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले होते. ते भारतातील पहिले उप प्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री होते. ब्रिटिश शासन काळात त्यांनी अनेक मोठमोठी आंदोलनांचे नेतृत्व केले आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील विविध संस्थांनांना एकत्र आणले.

जन्म स्थानापासून दूर राहून केला संघर्ष
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ओक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नडियादमध्ये झाला होता. ते झवेरभाई पटेल आणि लाडबा देवी यांचे चौथे अपत्य होते. 22 व्या वर्षी ते मॅट्रिक परिक्षा पास झाले आणि पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. भारतात परतल्यानंतर अहमदाबादमध्ये वकीली करु लागेल. त्यांनी गुजराचमध्ये दारु, अस्पृश्य,
महिल्यांवरील अत्याचाराविरोधात लढा दिला. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकता टिकवण्यासाठी देखील खूप प्रयत्न केले.

1917 साली मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळ ब्रिटीश सरकार शेतकऱ्यांकडून कर वसूल करायचे. पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी कर देऊ शकले नाही. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजीच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना एकत्र करुन इंग्रजांविरोधात आवाद उठवला. ही वल्लभभाई पटेल यांचे पहिले यश मानले जाते.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पटेल यांचे मोठे योगदान
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर, सरदार वल्लभभाई यांच्या प्रयत्नांनंतर संस्थानांचे विलीनीकरण केले. 15 ऑगस्ट 1947 च्या काही महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये वल्लभभाई पटेल यांनी 560 संस्थानांना भारतामध्ये एकत्र केले.

 

First Published on: December 15, 2022 12:15 PM
Exit mobile version